Wednesday, December 10, 2025

हक्कभंग....आजची वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------------
हक्कभंग
त्यांचे कारनामे पाहून पाहून,
आपण वेळोवेळी दंग होतो.
आपण काही बोललो की,
त्यांचा लगेच हक्कभंग होतो.
हक्कभंगाचा ठरावाला,
राजकारणाचा वास येऊ लागतो !
राजकीय शस्त्र म्हणून,
हक्कभंगाचा वापर होऊ लागतो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 44
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता
10 डिसेंबर 2025

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...