Monday, December 22, 2025

निकालाची झेरॉक्स....आजची वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------------
निकालाची झेरॉक्स
विजयाबरोबर पराभवाचीही,
टक्केवारी पुन्हा वाढली आहे.
विधानसभा निवडणूक निकालाची,
नगरपालिकेने झेरॉक्स काढली आहे.
जे जिंकले त्यांना विजयाची नशा,
जे हरले त्यांच्यासमोर पेच आहेत!
पुन्हा नव्याने आरोप सुरू,
झेरॉक्स मशीन तर तेच आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 53
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता
22 डिसेंबर 2025

 

No comments:

घुसखोरी....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- घुसखोरी खोटे खोटे बोलत रहा, खरे बोलायचीही चोरी आहे. हल्ली जिकडे बघावे तिकडे, घुसखोरी एके घुसखोरी...