Wednesday, December 31, 2025

गुंडा - गर्दी....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------
गुंडा - गर्दी
आम्ही नेहमीच सत्य शिकतो,
म्हणू नका आम्हाला सर्दी आहे.
उमेदवारी मिळणाऱ्यांच्या रांगेत,
सगळीकडेच गुंडांची गर्दी आहे.
गुंडांच्या उमेदवारीचे कारण,
तुम्हाला आम्हाला कळाले पाहिजे.
गुंडा पुंडाच्या लोकसंख्येएवढे,
त्यांना प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे.
त्यांच्या निवडून येण्याचे कारण,
असे नाही की,ते गुंड पुंड आहेत !
ज्यांच्या मतदानावर निवडून येतात,
तेच खरोखर थंड आणि षंढ आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9139
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
31 डिसेंबर2025

 

No comments:

daily vatratika....31dec2025