आजची वात्रटिका
-----------------------
हसवणूक
कुणी इकडून लढू लागले,
कुणी तिकडून लढू लागले.
भद्र- अभद्र आघाड्यांना,
वेगवेगळी नावे जोडू लागले.
कुणाची राजकीय सोय आहे,
कुणा कुणाचे हेवे दावे आहेत.
त्यांच्या प्रासंगिक करारांना,
आपापल्या सोयीची नावे आहेत.
स्वतःला आणि इतरांना,
सगळेच हातोहात फसवू लागले !
स्वतःचेच हसू करून,
इतरांनासुद्धा हसवू लागले !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9132
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
24डिसेंबर2025

No comments:
Post a Comment