आजची वात्रटिका
-----------------------
धक्कादायक सत्य
कुणी म्हणा गद्दारी,
कुणी म्हणा विश्वासघात आहे
विजय आणि पराभवातही,
विरोधकांचाच हात आहे.
ज्याचे ज्याचे जळले आहे,
फक्त त्यालाच कळलेले आहे.
ज्याला मिळायचे आहे त्याला,
नेमके उत्तर मिळलेले आहे.
कुणाची चालली बोंबाबोंब,
कुणी मात्र एकदम मूक आहे !
विजयाला आणि पराभवाला,
शेवटी सत्तेचीच भूक आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9131
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
23डिसेंबर2025

No comments:
Post a Comment