आजची वात्रटिका
----------------------------
विद्यार्थ्यांना छडीचे वार नको,
शहाण्याला शब्दाचा मार नको.
स्वयंशिस्तीला प्राधान्य द्या,
विद्यार्थ्यांवर शिस्तीचा भार नको.
विद्यार्थ्यांची स्वयंशिस्त,
हेच त्याच्या प्रगतीचे लक्षण आहे !
घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे,
विद्यार्थ्यांचे कायदेशीर रक्षण आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 59
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता
30 डिसेंबर 2025

No comments:
Post a Comment