Sunday, December 7, 2025

अधर्म...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
अधर्म
सुस्तावलेल्या समाजाचे,
एक मात्र खरोखरच मस्त आहे,
कर्मापेक्षा धर्मावरच,
समाजाची सगळी भिस्त आहे.
जिथे सगळी श्रद्धेवर भिस्त,
चर्चा आणि तर्काला वाव नाही.
धर्मापुढे माणसाच्या,
कशालाही कसलाच भाव नाही.
माणुसकी पेक्षाधर्म मोठे झाले,
माणूस मात्र छोटा छोटा होत गेला !
ज्याने केली धर्माची चिकित्सा,
धर्माच्या नजरेत तो खोटा होत गेला !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9116
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
7 डिसेंबर2025

 

No comments:

daily vatratika...7dec2025