Friday, December 26, 2025

पक्षीय पाहुणचार .....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------
पक्षीय पाहुणचार
जे जे कानामागून आले आहेत,
ते ते सगळे तिखट झाले आहेत.
पक्षा - पक्षातल्या निष्ठावंतांचे,
प्रश्न मात्र बिकट झाले आहेत.
कुणाचे वेगळेच रंग आहेत,
कुणाचे असंग अशी संग आहेत.
पाहुण्यांच्या पाहुणचारत,
सगळे राजकीय पक्ष दंग आहेत.
पाहुण्यांच्या पाहुणचारात,
सगळे निष्ठावंत उपाशी आहेत !
अनेक घरचे पाहुणे,
आज मात्र तुपाशी आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9134
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
26 डिसेंबर2025
 

No comments:

पक्षीय पाहुणचार .....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------- पक्षीय पाहुणचार जे जे कानामागून आले आहेत, ते ते सगळे तिखट झाले आहेत. पक्षा - पक्षातल्या निष्ठावंतांचे...