Sunday, December 28, 2025

गुऱ्हाळ चालू आहे....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------
गुऱ्हाळ चालू आहे
कल्पना आणि वास्तवापेक्षाही,
इथे बरेच काही होऊ शकते.
कुणीही कुणाच्या विरोधात,
कुणीही कुणासोबत जाऊ शकते.
काय होईल? काय नाही?
त्यांची त्यांनाच काही गॅरंटी नाही.
चर्चेचे रंगलेले गुऱ्हाळ सांगते,
लोकशाही कपाळ करंटी नाही.
कुणी जेवढा लापट आहे,
कुणी तेवढाच चिवट आहे !
राजकीय समीकरणांवर मात्र,
अनिश्चिततेचे सावट आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9136
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
28 डिसेंबर2025

 

No comments:

daily vatratika..28dec2025