Friday, December 3, 2010

व्वा रे धंदा !

शेतकर्‍यांचा माल स्वस्त,
व्यापार्‍यांचा महाग असतो.
चुकीच्या धोरणांचाच
हा सगळा भाग असतो.

एकाने रक्त ओकायचे,
एकाने महाग विकायचे,
हा चांगलाच धंदा आहे !
वर परत मखलाशी
तू जगाचा पोशिंदा आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

दैनिक वात्रटिका l 4 एप्रिल2025वर्ष- चौथेअंक - 305वा l पाने -57

दैनिक वात्रटिका l 4 एप्रिल2025 वर्ष- चौथे अंक - 305वा l पाने -57 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1VDZIPmnz1bKXOaj5nbZ...