Wednesday, December 22, 2010

कांदे-पुराण

भजे कुरकुरत म्हणाले,
कांद्याशिवाय मजा नाही.
पत्ता कोबी कोंबण्याएवढी
तळतळणारी सजा नाही.

भजे-कांद्याएवढीच दु:खी
हातगाड्यावरची भेळ आहे.
उतप्पा आंबट चेहर्‍याने म्हणाला,
माझ्यावरही तीच वेळ आहे.

खाणारापेक्षा पिकविणाराचेच
सगळीकडूनच वांधे आहेत !
जणू व्यवस्थेच्या डोक्यामध्ये
बटाटे आणि कांदे आहेत !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

1 comment:

Anonymous said...

मस्त ...

महागाईचा राक्षस सर्वाना खूप बडवू लागला आहे
कांदा आता चिरायच्या आधीच रडवू लागला आहे

सोशल स्टेटस ......प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- सोशल स्टेटस आजच्यासारखा राजकीय स्वार्थ, आम्ही यापूर्वी कधीच पाहिला नाही. शुभेच्छासारख्या शुभेच्छांनासुद्...