Thursday, February 2, 2012

उमेदवारीचा जुगार

कुणी बसला घोडय़ावर,
कुणाची माघार आहे.
पक्षीय उमेदवारी म्हणजे
राजकीय जुगार आहे.

ऐनवेळच्या माघारीमागे
बरेच काही शिजलेले असते!
बळीच्या बकर्‍याला
गोड बोलून पाणी पाजलेले असते!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

No comments:

ब्लॅक मेल

आजची वात्रटिका ---------------------- ब्लॅक मेल तुम्ही पास असूनसुद्धा, तुम्हांला फेल केले जाते. तुमचा विक पॉइंट शोधून, तुम्हांला ब्लॅक मेल क...