Sunday, February 19, 2012
शिवबाची शिवशाही
राजेशाहीचे नाव जरी
स्वराज्याची ग्वाही होती.
लोकशाहीस प्रेरणा देणारी
शिवबाची शिवशाही होती
स्वराज्य संकल्पक बाप,
दृढनिश्चयी आई होती
आत्मभान जागविणारी
शिवबाची शिवशाही होती.
समता अन मानवतेची
रात्रंदिवस द्वाही होती.
सह्याद्रीचा माथा उंचविणारी
शिवबाची शिवशाही होती.
ना जातीभेद, ना धर्मभेद
प्रजानिष्ठा ठायी ठायी होती
स्वामीनिष्ठेने भारलेली
शिवबाची शिवशाही होती
आत्मभानाची पेटती मशाल
जिथे स्वराज्याची घाई होती.
शत्रूस चळाचळा कापविणारी
शिवबाची शिवशाही होती
मातीस फाटाफुटीचा शाप,
जरी आपसात दुही होती.
त्या सर्वाना मिटविणारी
शिवबाची शिवशाही होती.
हे पडती शब्द अपूरे
याहूनही बरेच काही होती!
स्वातंत्र्याची गाथा रचणारी
शिवबाची शिवशाही होती!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मो. : 9923847269
Subscribe to:
Post Comments (Atom)
बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...

-
आजची वात्रटिका ---------------------- गेट-टुगेदर भूतकाळातले मित्र -मैत्रिणी, खूप वर्षानंतर भेटू लागले. उजळून येतात आठवणी, छोटे झाल्यासारखे व...
No comments:
Post a Comment