Monday, April 30, 2012
शेवटची सोय
अमुक खाल्ले, तमुक खाल्ले
अशा गोष्टी बोलल्या जातात.
मात्र खाणारांकडून सर्वात जास्त
जमिनी आणि जमिनी खाल्ल्या जातात.
जणू मृत्यूनंतरची व्यवस्था
जिवंतपणीच लावली जाते!
फुकटच्या जमिनी खाणे म्हणजे
शेवटची सोय करून ठेवली जाते!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Sunday, April 29, 2012
अनुदानाच्या 'वाटा'घाटी
नुकसान तर होतेचे
भरपाईतही घाटा असतो.
आलेल्या अनुदानात
कुणाचा तरी वाटा असतो.
अनुदानाच्या वाटेवरती
खुलेआम वाटमारी चालते!
अनुदानाच्या वाटय़ासाठ
वाढप्यांचीच साठमारी चालते!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
भरपाईतही घाटा असतो.
आलेल्या अनुदानात
कुणाचा तरी वाटा असतो.
अनुदानाच्या वाटेवरती
खुलेआम वाटमारी चालते!
अनुदानाच्या वाटय़ासाठ
वाढप्यांचीच साठमारी चालते!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
Saturday, April 28, 2012
पुरस्कारांची हौस
भारतरत्न पुरस्कार मिळालेलेही
गल्लीरत्नाला नाही म्हणत नाहीत.
देणारे देतात, घेणारे घेतात,
कुणालाच कुणी काही म्हणत नाहीत
एकदा भारतरत्न मिळाले की,
बाकी पुरस्कारांची गरजच काय आहे?
खर्या गरजवंतावरती
हा सरळ सरळ अन्याय आहे!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
Friday, April 27, 2012
खासदार सचिन?
एवढे सचिनचे नाव आहे.
भारतरत्नाऐवजी खासदारकी?
असे म्हणायला वाव आहे.
सचिनची खासदारकी
केवळ 'नावा'पुरती होऊ नये!
राज्यसभा म्हणजे
निव्वळ खोगीर भरती होऊ नये!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Thursday, April 26, 2012
खरे धोकेबाज
किती सहज थुका असतो.
या बनवाबनवीचाच तर
सर्वात मोठा धोका असतो.
नवे प्रसंग, नव्या थापा
एवढे ते डोकेबाज असतात!
एकवेळ नाकर्ते परवडले,
थापाडे खरे धोकेबाज असतात!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Wednesday, April 25, 2012
भावी राष्ट्रपती
कधी त्यांचे नाव पुढे आहे.
कुणाचे वरातीच्या पुढून
कुणाचे वराती मागे घोडे आहे
नामनिर्देश करण्याच्या बाबतीत
मीडियाही जोरात आहे!
कुणा-कुणाच्या नावाची
केवळ वार्यावर वरात आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Tuesday, April 24, 2012
आयपीएल
स्थानिक निवडणुकांते
कुणीही कुणाविरुद्ध लढतो आहे.
हे आयपीएल की आघाडय़ा?
लोकांना प्रश्न पडतो आहे.
अनैतिक आघाडय़ांचीच
जिकडे-तिकडे रीघ आहे!
खर्या अर्थाने हे
इंडियन पॉलिटिकल लीग आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
कुणीही कुणाविरुद्ध लढतो आहे.
हे आयपीएल की आघाडय़ा?
लोकांना प्रश्न पडतो आहे.
अनैतिक आघाडय़ांचीच
जिकडे-तिकडे रीघ आहे!
खर्या अर्थाने हे
इंडियन पॉलिटिकल लीग आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Monday, April 23, 2012
'फुट'कळ आनंद
टीम अण्णा फुटली की
कुणाला आनंदाच्या उकळ्या फुटतात.
कुणा-कुणाच्या गालावर
गुलाबाच्या पाकळ्या फुटतात.
कुणी येतील, कुणी जातील
टीम अण्णा फुटणार नाही!
भ्रष्टाचार्यांना सुटकेचा नि:श्वास
आता कधीच भेटणार नाही!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
कुणाला आनंदाच्या उकळ्या फुटतात.
कुणा-कुणाच्या गालावर
गुलाबाच्या पाकळ्या फुटतात.
कुणी येतील, कुणी जातील
टीम अण्णा फुटणार नाही!
भ्रष्टाचार्यांना सुटकेचा नि:श्वास
आता कधीच भेटणार नाही!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Sunday, April 22, 2012
भांडा 'हास्य'भरे
पाठिंबा आणि स्वबळाच्या मुद्याचे
पुन्हा पुन्हा कांडण आहे.
राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे
अगदी चिरंजीव भांडण आहे
भांडायचे तर खुशाल भांडावे
किमान मुद्दे नवे असायला हवेत!
लोकांचे मनोरंजन होऊन
लोक थोडेफार हसायला हवेत!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
पुन्हा पुन्हा कांडण आहे.
राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे
अगदी चिरंजीव भांडण आहे
भांडायचे तर खुशाल भांडावे
किमान मुद्दे नवे असायला हवेत!
लोकांचे मनोरंजन होऊन
लोक थोडेफार हसायला हवेत!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Saturday, April 21, 2012
रिक्षा स्टॅण्डवरचा संवाद
संपावर जाण्याचा
तिचा नेहमीप्रमाणे दावा आहे.
तो कायदा दाखवीत बोलला,
तुझी अत्यावश्यक सेवा आहे.
ती गिअर बदलत म्हणाली,
उगीच कायद्याचे भाषण नको!
अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली
सतत माझेच शोषण नको!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
तिचा नेहमीप्रमाणे दावा आहे.
तो कायदा दाखवीत बोलला,
तुझी अत्यावश्यक सेवा आहे.
ती गिअर बदलत म्हणाली,
उगीच कायद्याचे भाषण नको!
अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली
सतत माझेच शोषण नको!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Friday, April 20, 2012
हे देव-देवतांनो..
आमच्या श्रद्धेचा अंत पाहू नका,
तुमचे रक्षण तुम्हीच करा
आमच्या भरवशावर राहू नका.
आमच्यापेक्षा तुमच्याच
इज्जतीचा सवाल आहे,
चोरांच्या चोरी प्रकरणांचा
सारखाच हालहवाल आहे.
आमच्या वाटय़ाचे दु:ख
तुमच्याही वाटय़ाला आलेले आहे!
सत्ययुग केव्हाच संपलेय
कलियुग आलेले आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Thursday, April 19, 2012
महाचोरांचा आदर्श
महाचोर मोकाट सुटल्याने
भुरटे चोर सोकायला लागले.
देवाच्या देवळावरही
दरोडे टाकायला लागले.
महाचोरांना कायद्याची भीती नाही
भुरटय़ांना कुठे देवाचे भेव आहे?
महाचोरांच्या आदर्शामुळेच
जणू भुरटय़ा चोरांना चेव आहे!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Wednesday, April 18, 2012
चोरी झालीच नाही
चोरी पकडलेली पाहून
चोर पस्तावलेले होते.
शिक्षेच्या भीतीने
चोर धास्तावलेले होते.
रंगेहाथ पकडूनही
शिक्षेची वेळ आलीच नाही!
चौकशीचा 'आदर्श' अहवाल आला
चोरी झालीच नाही!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Tuesday, April 17, 2012
दुष्काळी चित्र
आभाळाचा रुसवा,
रानं रापलेली असतात.
दुष्काळाची वाट बघत
गिधाडं टपलेली असतात.
दुष्काळही सुकाळ ठरतो,
इथेच सगळा पचका असतो!
गिधाडं ती गिधाडंच
त्यांचा लचक्यावर लचका असतो!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
रानं रापलेली असतात.
दुष्काळाची वाट बघत
गिधाडं टपलेली असतात.
दुष्काळही सुकाळ ठरतो,
इथेच सगळा पचका असतो!
गिधाडं ती गिधाडंच
त्यांचा लचक्यावर लचका असतो!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Monday, April 16, 2012
नाही 'निर्मल' जीवन.....
बाबा निर्मल नाहीतच,
भक्त तरी कुठे धुतलेले आहेत?
पायावर पैसे ओतण्याएवढे
वेडे भक्त मातलेले आहेत.
असले यडछाप प्रकार
एकदा नाहीत, बारबार आहेत!
रोज कुठेना कुठे भरलेले
बाबांचे दरबार आहेत!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
भक्त तरी कुठे धुतलेले आहेत?
पायावर पैसे ओतण्याएवढे
वेडे भक्त मातलेले आहेत.
असले यडछाप प्रकार
एकदा नाहीत, बारबार आहेत!
रोज कुठेना कुठे भरलेले
बाबांचे दरबार आहेत!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Sunday, April 15, 2012
दुष्काळाचे सावट
गाय म्हणाली बैलाला,
किती रे तू चावट आहे?
खाताना जरा विचार कर
राज्यात दुष्काळाचे सावट आहे.
गरीब गाय, करील काय ?
बैल मस्तावलेले आहेत!
दुष्काळाच्या सावटाने
सारेच धास्तावलेले आहेत !!
- सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
Saturday, April 14, 2012
आमच्या या देहामधली भीमराया जान तू ..
पेटविलीस मने तू, पेटविलेस रान तू,
आमच्या देहामधली भीमराया जान तू ।।धृ।।
केलास उद्धार तू, झालास आधार तू
कबीरांच्या दोह्यांना केलेस मदार तू
मुर्दाडांच्या कानामध्ये फुंकलेस प्राण तू ।।1।।
वाघिणीचे दूध प्याला, भीमराव वाघ झाला
फुरफुरलास तू, गुरगुरलास तू
माणसातल्या सैतानांची केली दाणादाण तू ।।2।।
धन्य तुझे काम, धन्य काळाराम
चवदार तळे तू, आम्हांलाच कळे तू
ज्योतिबांच्या अखंडाचे केलेस गुणगान तू ।।3।।
ज्ञान हीच शक्ती, ज्ञान हीच भक्ती
केलेस सिद्ध तू, झालास बुद्ध तू
गौतमाच्या धम्माचे एक एक पान तू ।।4।।
विद्रोहाचे कूळ तू, लेखणीचे बळ तू
बापांचा बाप तू, डफावरची थाप तू
वेडय़ा भीमशाहिराने घेतलेली तान तू ।।5।।
ना ढळली रीत कधी, ना ढळली प्रीत कधी
झालास कायदा तू, प्रगतीचा वायदा तू
हे क्रांतिसूर्या, हे विश्वरत्ना, भारताची शान तू ।।6।।
ना ढळली रीत कधी, ना ढळली प्रीत कधी
प्रज्ञेचे आगर तू, करुणेचा सागर तू
शीलाचा जागर तू, दिलाचा जिगर तू
बावीस त्या प्रतिज्ञांचा राखलास मान तू ।।7।।
हे शब्द अल्प माझे, घटनेचे शिल्प तुझे
दाविलास मार्ग तू, दाविलास स्वर्ग तू
हे इतिहासाच्या निर्मात्या, भविष्याचे भान तू ।।8।।
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मो. : 9923847269
Friday, April 13, 2012
जयंती लिमिटेड
पिणारे पितात, खाणारे खातात
मस्त मजा केली जाते.
जयंत्यांपुरती का होईना
राष्ट्रपुरुषांची पूजा केली जाते.
पुन्हा नवे बहाणे,
पुन्हा नवे मार्ग धुंडाळले जातात!
विचारांसकट राष्ट्रपुरुष
वर्षभरासाठी गुंडाळले जातात!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Thursday, April 12, 2012
फोटोळी
आजूबाजूचे फोटो बघून
राष्ट्रपुरुषांची बेजारी आहे.
गुंड, मवाल्यांचा फोटोही
राष्ट्रपुरुषांच्या शेजारी आहे
गुंड, मवाल्यांच्या पंटरांना
ही फोटोगिरी पटत असेल!
जरा कल्पना करा
राष्ट्रपुरुषांना काय वाटत असेल!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Wednesday, April 11, 2012
टंचाई आणि दुष्काळ
तगमग असह्य होऊन
त्याचा श्वास दाटायचा.
ती ज्याला टंचाई म्हणायची
त्याला तो दुष्काळ वाटायचा.
टंचाई आणि दुष्काळातले
अंतरच न कळणारे असते!
दिसतानाही दुष्काळ नाकारणे
दुष्काळापेक्षाही छळणारे असते!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Tuesday, April 10, 2012
8 अ चा (पाण)उतारा
गल्लीतल्याने झोपडपट्टी लाटायची,
दिल्लीतल्याने फ्लॅट लाटायचा असतो.
भूखंडाचा श्रीखंड तर
नातेवाईकांनाही वाटायचा असतो.
लाटलेल्या आणि लुटलेल्या जमिनी
इतरांच्या नावे लावलेल्या असतात!
गरज पडली तर सोय म्हणून
नेत्यांनी रखेल्या ठेवलेल्या असतात!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Monday, April 9, 2012
अशी असावी वात्रटिका
वात्रटिकेत केवळ यमक नको,
वातट्रिकेत धमक पाहिजे.
मेंदूत प्रकाश पडावा
अशी वात्रटिकेत चमक पाहिजे.
वात्रटिका भाकड नसावी,
वात्रटिका वांझोटी असू नये.
वात्रटिकेला विनोद समजून
कुणी निरर्थक हसू नये.
प्रत्येक शब्द म्हणजे
धक्क्यामागे धक्का पाहिजे!
हे ऐर्यागैर्याचे काम नाही
वैचारिक पाया पक्का पाहिजे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Sunday, April 8, 2012
धार्मिक दलाली
ज्याचा त्याचा धर्म
ज्याने त्याने पाळला पाहिजे.
इतरांचा नाही, पण
आपला धर्म कळला पाहिजे.
प्रत्येक धर्माभोवती
दलालांचे विषारी वेटोळे आहे!
दलालांच्या दलालीमुळेच
चांगल्या धर्माचे वाटोळे आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा(बीड)
ज्याने त्याने पाळला पाहिजे.
इतरांचा नाही, पण
आपला धर्म कळला पाहिजे.
प्रत्येक धर्माभोवती
दलालांचे विषारी वेटोळे आहे!
दलालांच्या दलालीमुळेच
चांगल्या धर्माचे वाटोळे आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा(बीड)
Saturday, April 7, 2012
चमत्काराचा पंचनामा
कुठे मूर्तीतून रक्त येते.
कुठे मूर्ती रडू लागतात
भक्तांच्या श्रद्धेचे पंचनामे
जगजाहीरपणे घडू लागतात.
चमत्कार दिसतो, वास्तव नाही
ती नजर आंधळी असते!
अंधश्रद्धाळू भक्तांची तर्हाच
गोंधळी अन वेंधळी असते!!
भक्तांच्या श्रद्धेचे पंचनामे
जगजाहीरपणे घडू लागतात.
चमत्कार दिसतो, वास्तव नाही
ती नजर आंधळी असते!
अंधश्रद्धाळू भक्तांची तर्हाच
गोंधळी अन वेंधळी असते!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Friday, April 6, 2012
त्यांची ओळख
******* आजची वात्रटिका******
*****************************
त्यांची ओळख
शब्द कसे फिरवावेत
यात ते माहिर आहेत.
त्यांनी खुपसलेले खंजीर
तसे जगजाहीर आहे.
त्यांच्या फिरवाफिरवीचे डावपेच
मुत्सद्दीपणाचे वाटले जातात!
त्यांचा आदर्श घेऊनच
गवताला भाले फुटले जातात!!
शब्द कसे फिरवावेत
यात ते माहिर आहेत.
त्यांनी खुपसलेले खंजीर
तसे जगजाहीर आहे.
त्यांच्या फिरवाफिरवीचे डावपेच
मुत्सद्दीपणाचे वाटले जातात!
त्यांचा आदर्श घेऊनच
गवताला भाले फुटले जातात!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Thursday, April 5, 2012
खरडय़ाची खरडपट्टी
बारामतीकर सहसा
कुणाला खेटत नाहीत.
केवळ खरडा भाकर खाऊन
म्हणे प्रश्न सुटत नाहीत.
सातार्याच्या खरडाभाकरीची
बारामतीकडून खरडपट्टी आहे!
जास्त काही विचारू नका
तुमची आमची कट्टी आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Wednesday, April 4, 2012
क्राईम स्टोरी
कल्पना आणि वास्तवात
भयानक मॅचिंग आहे.
टीव्ही सीरियल म्हणजे
गुन्हेगारीचे कोचिंग आहे.
ही क्राईम स्टोरी उलगडायला
सीआयडीच हवा कशाला?
आमचे 'लक्ष्य' वेगळे आहे
हा नाटकी दावा कशाला?
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Tuesday, April 3, 2012
सभापतीनामा
कुणी झाले सभापतीे
कुणी सभापतीचे पती आहेत.
एकूण काय तर
सर्वाधिकार पुरुषांच्या हाती आहेत
50 टक्के महिला आरक्षणाचा
असा आरक्षणनामा आहे!
सहीचा अधिकारही
नवर्याकडेच जमा आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Monday, April 2, 2012
रद्दीच्या भावात
स्पर्धेच्या युगामध्ये
नको त्या फंडय़ांचे वापर आहेत.
अगदी रद्दीच्या भावात
आजकाल पेपर आहेत.
वाचकांना रद्दी नको,
लोकांना विचार हवे आहेत!
हे सांगायची गरज नाही
कुणाचे काय काय दिवे आहेत!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Sunday, April 1, 2012
हे एप्रिल फूल नाही
आशेचा किरण दिसला नाही की,
निराशेच्या सावल्या दाटू लागतात
खर्या खुर्या बातम्याही मग
चक्क 'एप्रिल फूल’ वाटू लागतात.
त्यांचे नेहमीचेच एपिल्र फूल
नेहमीचीच टोलवाटोलवी असते!
मात्र एपिल्र फूलच्या सोबतीला
नक्की चैत्राची पालवी असते!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
निराशेच्या सावल्या दाटू लागतात
खर्या खुर्या बातम्याही मग
चक्क 'एप्रिल फूल’ वाटू लागतात.
त्यांचे नेहमीचेच एपिल्र फूल
नेहमीचीच टोलवाटोलवी असते!
मात्र एपिल्र फूलच्या सोबतीला
नक्की चैत्राची पालवी असते!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
Subscribe to:
Posts (Atom)
दैनिक वात्रटिका l 28मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 298वा l पाने -54
दैनिक वात्रटिका l 28मार्च 2025 वर्ष- चौथे अंक - 298वा l पाने -54 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1QFQFkgKdfL7eY4viFxy...

-
आजची वात्रटिका ---------------------- गेट-टुगेदर भूतकाळातले मित्र -मैत्रिणी, खूप वर्षानंतर भेटू लागले. उजळून येतात आठवणी, छोटे झाल्यासारखे व...