आजची वात्रटिका
----------------------------
अध्यात्मिक कावा
ग्लोबल असो वा लोकल,
शेवटी बुवा तो बुवा असतो.
बुवांची बुवाबाजी म्हणजे,
अध्यात्मिक कावा असतो.
जेवढे हाय फाय बाबा बुवा,
तेवढे हाय फाय भक्त असतात.
बडा घर पोकळ वासा,
एकमेकांवरती आसक्त असतात.
कधीतरी होतो पर्दाफाश,
कधीतरी भांडे फुटले जाते !
पुन्हा नव्याने बाबा बुवांकडून,
भोळ्या भक्तांना लुटले जाते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9421
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
8ऑक्टोबर 2026
