दैनिक वात्रटिका l 11मार्च 2025
वर्ष- चौथे
अंक - 282 वा l पाने -51
अंक डाऊनलोड लिंक -
https://drive.google.com/file/d/1FtmsthchWqYIA-KAf03DPHn-yAA7Go0t/view?usp=drivesdk
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
#मराठीवात्रटिका
#दैनिकवात्रटिका
Tuesday, March 11, 2025
दैनिक वात्रटिका l 11मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 282 वा l पाने -51
अर्थसंकल्प आणि विरोधक ..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका.
--------------------
अर्थसंकल्प आणि विरोधक
काय आहे यापेक्षा काय नाही?
यावरती बोटं ठेवले जातात.
विरोधकांकडून अर्थसंकल्पाचे,
नकारात्मक अर्थ लावले जातात.
सत्तेमध्ये बदल झाला तरी,
विरोधक तसेच वागत असतात.
विरोधाला विरोध करून,
विरोधक नावाला जागत असतात.
आपल्या पारंपरिक प्रतिक्रियावर,
विरोधी पक्ष धन्य असतो !
अर्थसंकल्प कोणत्याही वर्षाचा असो,
विरोधकांसाठी तो अर्थशून्य असतो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8854
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
11मार्च2025
Monday, March 10, 2025
दैनिक वात्रटिका l 10मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 281 वा l पाने -51
दैनिक वात्रटिका l 10मार्च 2025
वर्ष- चौथे
अंक - 281 वा l पाने -51
अंक डाऊनलोड लिंक -
https://drive.google.com/file/d/1Ea76CT5y6gMt8dvejef9nMHioHVD5Olj/view?usp=drivesdk
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
#मराठीवात्रटिका
#दैनिकवात्रटिका
राजकीय सूडचक्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
--------------------
राजकीय सूडचक्र
ना यांचे धडाचे वाटत आहे,
ना त्यांचे धडाचे वाटत आहे.
एकूणच सगळे राजकारण,
राजकीय सुडाचे वाटत आहे.
काल ज्यांनी एकमेकांची झाकली,
तेच आज एकमेकांना नागवत आहेत.
वाटेल त्या थराला जाऊन
तेच आज राजकीय सुड उगवत आहेत.
ज्या गोष्टी आज घडत आहेत,
त्याच गोष्टी उद्याही घडू शकतात !
देशामध्ये सगळेच्या सगळे तुरुंग,
नक्की अपुरे पडू शकतात !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8853
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
10मार्च2025
Sunday, March 9, 2025
दैनिक वात्रटिका l 9मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 280 वा l पाने -51
दैनिक वात्रटिका l 9मार्च 2025
वर्ष- चौथे
अंक - 280 वा l पाने -51
अंक डाऊनलोड लिंक -
https://drive.google.com/file/d/1E8AeVFf51O1VJr-Ah23epLohaETX3LfH/view?usp=drivesdk
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
#मराठीवात्रटिका
#दैनिकवात्रटिका
जंगल राज... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
--------------------
जंगल राज
कुठल्याही जंगलचा कायदा,
असा काही फटका देऊन जातो.
प्रत्यक्ष शिकारीसुद्धा मग,
इथे आयती शिकार होऊन जातो.
आपण केलेली पापं सुद्धा,
जिथल्या तिथे फेडावे लागतात.
इतरांसाठी टाकलेल्या जाळ्यात,
स्वतःलाच हातपाय खुडावे लागतात.
इथे शिकार आणि शिकारी सुद्धा,
कधी एकच आणि कायम नसतो !
बळी तो कानपिळी,
हाच इथला जंगली नियम असतो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8852
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
9 मार्च2025
Saturday, March 8, 2025
दैनिक वात्रटिका l 8मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 279 वा l पाने -51
आठ मार्चचा संवाद...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
--------------------
आठ मार्चचा संवाद
आरक्त होऊ; विरक्त होऊ ,
आपण एकमेकांचे भक्त होऊ.
आपण एकमेकांपासून नाही,
अनिष्ट परंपरांपासून मुक्त होऊ.
आपण परस्परांचे साथीदार,
आपल्यात कशाला रेस हवी आहे?
तुझी तुला;माझी मला,
दोघांनाही स्वतःची स्पेस हवी आहे.
आपण परस्पर पूरक ठरू,
अशीच प्राकृतिक रचना आहे !
स्पर्धा नको;संघर्ष नको,
ही याचना नाही सूचना आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8851
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
8 मार्च2025
Friday, March 7, 2025
दैनिक वात्रटिका l 7मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 278 वा l पाने -51
दैनिक वात्रटिका l 7मार्च 2025
वर्ष- चौथे
अंक - 278 वा l पाने -51
अंक डाऊनलोड लिंक -
https://drive.google.com/file/d/1DYJincZ7T3uoI3CGd6UP0URStpo6KMbm/view?usp=drivesdk
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
#मराठीवात्रटिका
#दैनिकवात्रटिका
सावधानतेचा इशारा ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
--------------------
सावधानतेचा इशारा
गुन्हेगारीशिवाय राजकारण नाही,
राजकारणाशिवाय गुन्हेगारी नाही.
राजकारण आणि गुन्हेगारीलाही,
आजकाल ही गोष्ट काही न्यारी नाही.
दोघांचेही एकमेकांना उघड नाही,
पण छुपे समर्थन मात्र चालू आहे.
परस्परांच्या जयघोष करीत,
एकमेकांचे कीर्तन मात्र चालू आहे.
असंगाशी संग प्राणाशी गाठ,
हे अनुभवाने सिद्ध झालेले आहे !
ज्याला कळूननही वळलेले नाही
त्याचे राजकारण गोत्यात आलेले आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8850
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
7 मार्च2025
Thursday, March 6, 2025
दैनिक वात्रटिका l 6मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 277 वा l पाने -51
बदनामी आणि उदात्तीकरण...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
--------------------
बदनामी आणि उदात्तीकरण
कुणी करतोय बदनामी,
कुणी उदात्तीकरण करतो आहे.
ज्याला जसे पाहिजे तसे,
जो तो राजकारण करतो आहे.
बदनामी आणि उदात्तीकरण,
ही तर सारखीच कृती आहे.
सारे एकाच माळीचे मणी,
ही तर सारखीच विकृती आहे.
बदनामी आणि उदातीकरणाचे,
अनेक अनुभव पाठीस आहेत !
इतिहासातले नायक खलनायक,
राजकारणासाठी वेठीस आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8849
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
6 मार्च2025
Wednesday, March 5, 2025
दैनिक वात्रटिका l 5मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 276 वा l पाने -51
दैनिक वात्रटिका l 5मार्च 2025
वर्ष- चौथे
अंक - 276 वा l पाने -51
अंक डाऊनलोड लिंक -
https://drive.google.com/file/d/1Bw3CxGIJAOc14HGyqlZYYVzJhOZ0GQWJ/view?usp=drivesdk
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
#मराठीवात्रटिका
#दैनिकवात्रटिका
जोडधंदा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
--------------------
जोडधंदा
गुन्हेगारी बघत नाही,
कोण सावत्र?कोण सख्खे आहे?
गुन्हेगारीचे राजकारणाशी,
नाते एकदम पक्के आहे.
दोघांचे नाते जेवढे पक्के,
तेवढे ते ठळक दिसते आहे.
अजूनही प्रश्न अनुत्तरीत आहे,
नेमके कोण कुणाला पोसते आहे?
दोघांचाही एकमेकांच्या,
आज खांद्याला खांदा आहे !
त्यांचे त्यांनाही कळत नसावे,
कोण कुणाचा जोडधंदा आहे?
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8848
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
5 मार्च2025
Tuesday, March 4, 2025
दैनिक वात्रटिका l 4मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 275 वा l पाने -51
दैनिक वात्रटिका l 4मार्च 2025
वर्ष- चौथे
अंक - 275 वा l पाने -51
अंक डाऊनलोड लिंक -
https://drive.google.com/file/d/1BJOSA5iXqzo9xGi07IjKT9ocLNwAIX6J/view?usp=drivesdk
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
#मराठीवात्रटिका
#दैनिकवात्रटिका
मूकसंमती....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
--------------------
मूकसंमती
नागव्यांना नागवेपणाची,
सांगा कुठे लज्जा आहे?
नागव्यांना नागवे म्हणती,
नागवेपणातच मज्जा आहे.
नागव्यांच्या नागवेपणाला,
कोपरापासून सलाम आहेत.
त्यांच्या निर्लज्जपणाचे कारण,
नागवे सवयीचे गुलाम आहेत.
नागव्यांचा त्यात दोष नाही,
त्यांची जी अवस्था आहे !
नागव्यांना असते मूकसंमती
निर्लज्ज इथली व्यवस्था आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8847
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
4 मार्च2025
Monday, March 3, 2025
दैनिक वात्रटिका l 3मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 274 वा l पाने -51
दैनिक वात्रटिका l 3मार्च 2025
वर्ष- चौथे
अंक - 274 वा l पाने -51
अंक डाऊनलोड लिंक -
https://drive.google.com/file/d/1Awc7iVN2v1CiY_qs7rQ5zKN4IVu1xQx7/view?usp=drivesdk
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
#मराठीवात्रटिका
#दैनिकवात्रटिका
सुप्त भीती ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
--------------------
सुप्त भीती
हातामध्ये सत्ता तरी,
पोटात भीतीचा गोळा आहे.
परस्परांच्या वाईटावर,
परस्परांचाच डोळा आहे.
ज्याच्या त्याच्या मनामध्ये,
ज्याची त्याची शंका आहे.
विसंवादावर विसंवाद,
तरी सामंजस्याचा डंका आहे.
इतरांचे चांगले चिंतायला,
एवढे कुठे महात्मे आहेत?
प्रत्येकाची वाढली भूक,
सगळेच अतृप्त आत्मे आहेत!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8846
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
3 मार्च2025
Sunday, March 2, 2025
दैनिक वात्रटिका l 2 मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 273 वा l पाने -51
मोबाईल गाथा..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
--------------------
मोबाईल गाथा
घरोघरी आणि दारोदारी,
सर्व चित्रं अगदी कॉमन आहेत.
जसे मोबाईल मॅन आहेत,
तशा मोबाईल वुमन आहेत.
जोडीला मोबाईल गर्ल आहेत,
जोडीला मोबाईल बॉय आहेत.
मोबाईल झाला सहावे ज्ञानेन्द्रिय,
हॅलो सोबत फक्त हाय आहेत.
मोबाईल शाप की वरदान?
तोंड दाबून बुक्क्यांचे मार आहेत !
माणसांच्या हाती मोबाईल तरी,
मोबाईल माणसांवर स्वार आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8845
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
2 मार्च2025
Saturday, March 1, 2025
दैनिक वात्रटिका l 1 मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 272वा l पाने -51
दैनिक वात्रटिका l 1 मार्च 2025
वर्ष- चौथे
अंक - 272वा l पाने -51
अंक डाऊनलोड लिंक -
https://drive.google.com/file/d/19qjdDU-k7rrrCsxf3nt9eVn7uxJna9vW/view?usp=drivesdk
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
#मराठीवात्रटिका
#दैनिकवात्रटिका
व्यवस्था शुद्धीकरण...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
--------------------
व्यवस्था शुद्धीकरण
आपली व्यवस्था सडलेली आहे,
आपली व्यवस्था किडलेली आहे.
सडलेल्या किडलेल्या व्यवस्थेने,
सामान्य जनता वेढलेली आहे.
आपली व्यवस्था सडवणारे,
आपलेच सडके लोक आहेत.
आपली व्यवस्था किडवणारे,
आपलेच किडके लोक आहेत.
व्यवस्था शुद्धीकरणाचे दावे,
तोपर्यंत तरी फुसके आहेत !
जोपर्यंत व्यवस्थेच्या आत बाहेर,
फक्त नासके आणि नासके आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8844
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
1 मार्च2025
महाराष्ट्र माझा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका -------------------------- महाराष्ट्र माझा भोंदू बाबांचा सुळसुळाट झाला, सगळ्या भोंदूंचाच गाजावाजा. आपल्या स्वतःचीच फसवणूक, आज...
-
आजची वात्रटिका ---------------------- गेट-टुगेदर भूतकाळातले मित्र -मैत्रिणी, खूप वर्षानंतर भेटू लागले. उजळून येतात आठवणी, छोटे झाल्यासारखे व...





















