आजची वात्रटिका
--------------------
व्यवस्था शुद्धीकरण
आपली व्यवस्था सडलेली आहे,
आपली व्यवस्था किडलेली आहे.
सडलेल्या किडलेल्या व्यवस्थेने,
सामान्य जनता वेढलेली आहे.
आपली व्यवस्था सडवणारे,
आपलेच सडके लोक आहेत.
आपली व्यवस्था किडवणारे,
आपलेच किडके लोक आहेत.
व्यवस्था शुद्धीकरणाचे दावे,
तोपर्यंत तरी फुसके आहेत !
जोपर्यंत व्यवस्थेच्या आत बाहेर,
फक्त नासके आणि नासके आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8844
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
1 मार्च2025
No comments:
Post a Comment