Tuesday, March 18, 2025

दंगल लाईव्ह....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------

दंगल लाईव्ह

थोडी गुंडगिरी,थोडी जाळपोळ,
बाकी मात्र सगळे मंगल आहे.
आज-काल न्यूज चॅनलवरती,
सरळ सरळ लाईव्ह दंगल आहे.

दंगल लाईव्ह असतेच असते,
दंगलीचे ॲक्शन रिप्ले असतात.
टी.आर.पी. च्या स्पर्धेसाठी,
सामाजिक शांततेला हेपले असतात.

ज्याचा त्याचा अति उत्साह,
ज्याने त्याने नक्की आवरला पाहिजे !
सैरभैर आणि भयभीत समाज,
सर्वांनी मिळून सावरला पाहिजे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8860
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
18मार्च2025
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...