आजची वात्रटिका
--------------------
डबल गेम
आरोपींना समर्थन देण्यात,
सगळेच व्यस्त झाले.
आरोपींना विरोधक कमी,
पाठीराखेच जास्त झाले.
आरोपी वेगळा,गुन्हेगार वेगळा,
आम्हाला सुद्धा मान्य आहे.
आरोपींची बाजू घेणाऱ्या,
समर्थकांची धन्य धन्य आहे.
आपला तो आरोपी,
दुसऱ्याचा तो गुन्हेगार आहे !
विरोधक आणि समर्थकांची,
बॅटिंगसुद्धा धुंव्वाधार आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8859
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
17मार्च2025
No comments:
Post a Comment