आजची वात्रटिका
--------------------
जोडधंदा
गुन्हेगारी बघत नाही,
कोण सावत्र?कोण सख्खे आहे?
गुन्हेगारीचे राजकारणाशी,
नाते एकदम पक्के आहे.
दोघांचे नाते जेवढे पक्के,
तेवढे ते ठळक दिसते आहे.
अजूनही प्रश्न अनुत्तरीत आहे,
नेमके कोण कुणाला पोसते आहे?
दोघांचाही एकमेकांच्या,
आज खांद्याला खांदा आहे !
त्यांचे त्यांनाही कळत नसावे,
कोण कुणाचा जोडधंदा आहे?
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8848
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
5 मार्च2025
No comments:
Post a Comment