आजची वात्रटिका
--------------------
होळीची अपेक्षा
नेत्यांच्या राजकीय शिमग्यापुढे,
होळीसुद्धा फिकी वाटू लागली.
आपली अभिजात मराठी भाषा,
रोज नवा कळस गाठू लागली.
त्यांचा रोज नवा शिमगा आहे,
त्यांची रोज नवी धुरवड आहे.
अभिजात मराठी भाषेची तर,
रोजच्या रोज नवी परवड आहे.
रोज शिमगा खेळा;होळ्या खेळा,
भाषिक स्तर घसरू देऊ नका !
बुरा न मानो होली है.....
एवढे मात्र विसरू देऊ नका !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8857
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
14मार्च2025
No comments:
Post a Comment