आजची वात्रटिका
--------------------
सुप्त भीती
हातामध्ये सत्ता तरी,
पोटात भीतीचा गोळा आहे.
परस्परांच्या वाईटावर,
परस्परांचाच डोळा आहे.
ज्याच्या त्याच्या मनामध्ये,
ज्याची त्याची शंका आहे.
विसंवादावर विसंवाद,
तरी सामंजस्याचा डंका आहे.
इतरांचे चांगले चिंतायला,
एवढे कुठे महात्मे आहेत?
प्रत्येकाची वाढली भूक,
सगळेच अतृप्त आत्मे आहेत!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8846
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
3 मार्च2025
No comments:
Post a Comment