आजची वात्रटिका
--------------------
ऑर्डर....ऑर्डर...
आपल्या न्यायव्यवस्थेचा,
असा विचित्र प्रकार पाहिला नाही.
प्रत्यक्ष कोर्टांच्या निर्णयावर,
न्यायाधीशांचा विश्वास राहिला नाही.
जनहिताच्या गोंडस नावाखाली,
गुन्हेगारांचीही पाठराखण आहे.
झाकले 'माणिक ' उघडे होताच,
त्याच्यावरती सुद्धा झाकण आहे.
कधी निकाल झट की पट,
कधी निकाल दूरवरती लोटला जातो !
चोर सोडून संन्याशाचाच,
अगदी ठरवून गळा घोटला जातो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8858
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
16मार्च2025
No comments:
Post a Comment