आजची वात्रटिका
--------------------
मोबाईल गाथा
घरोघरी आणि दारोदारी,
सर्व चित्रं अगदी कॉमन आहेत.
जसे मोबाईल मॅन आहेत,
तशा मोबाईल वुमन आहेत.
जोडीला मोबाईल गर्ल आहेत,
जोडीला मोबाईल बॉय आहेत.
मोबाईल झाला सहावे ज्ञानेन्द्रिय,
हॅलो सोबत फक्त हाय आहेत.
मोबाईल शाप की वरदान?
तोंड दाबून बुक्क्यांचे मार आहेत !
माणसांच्या हाती मोबाईल तरी,
मोबाईल माणसांवर स्वार आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8845
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
2 मार्च2025
No comments:
Post a Comment