Monday, March 10, 2025

राजकीय सूडचक्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------

राजकीय सूडचक्र

ना यांचे धडाचे वाटत आहे,
ना त्यांचे धडाचे वाटत आहे.
एकूणच सगळे राजकारण,
राजकीय सुडाचे वाटत आहे.

काल ज्यांनी एकमेकांची झाकली,
तेच आज एकमेकांना नागवत आहेत.
वाटेल त्या थराला जाऊन
तेच आज राजकीय सुड उगवत आहेत.

ज्या गोष्टी आज घडत आहेत,
त्याच गोष्टी उद्याही घडू शकतात !
देशामध्ये सगळेच्या सगळे तुरुंग,
नक्की अपुरे पडू शकतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8853
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
10मार्च2025
 

No comments:

DAILY VATRATIKA...10MARCH2025