आजची वात्रटिका
--------------------
अर्थसंकल्प आणि विरोधक
काय आहे यापेक्षा काय नाही?
यावरती बोटं ठेवले जातात.
विरोधकांकडून अर्थसंकल्पाचे,
नकारात्मक अर्थ लावले जातात.
सत्तेमध्ये बदल झाला तरी,
विरोधक तसेच वागत असतात.
विरोधाला विरोध करून,
विरोधक नावाला जागत असतात.
आपल्या पारंपरिक प्रतिक्रियावर,
विरोधी पक्ष धन्य असतो !
अर्थसंकल्प कोणत्याही वर्षाचा असो,
विरोधकांसाठी तो अर्थशून्य असतो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8854
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
11मार्च2025
No comments:
Post a Comment