Wednesday, March 12, 2025

समज आणि गैरसमज ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------

समज आणि गैरसमज

अनेक फरार आरोपीचे,
जणू मीडियाशी साटेलोटे आहे.
त्याच्याशिवाय का माहित होते,
आरोपी नेमका कुठे आहे?

तिकडे आरोपी फरार,
इकडे मुलाखत रंगली जाते.
नेमके हेच कळत नाही,
कुणाची प्रतिमा भंगली जाते?

तपासणी यंत्रणांच्या हालचाली,
जणू जास्तच मंदावत आहेत !
शोध पत्रकारितेच्या कक्षा मात्र,
जरा जास्तच रुंदावत आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8855
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
12मार्च2025
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...