आजची वात्रटिका
--------------------
सावधानतेचा इशारा
गुन्हेगारीशिवाय राजकारण नाही,
राजकारणाशिवाय गुन्हेगारी नाही.
राजकारण आणि गुन्हेगारीलाही,
आजकाल ही गोष्ट काही न्यारी नाही.
दोघांचेही एकमेकांना उघड नाही,
पण छुपे समर्थन मात्र चालू आहे.
परस्परांच्या जयघोष करीत,
एकमेकांचे कीर्तन मात्र चालू आहे.
असंगाशी संग प्राणाशी गाठ,
हे अनुभवाने सिद्ध झालेले आहे !
ज्याला कळूननही वळलेले नाही
त्याचे राजकारण गोत्यात आलेले आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8850
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
7 मार्च2025
No comments:
Post a Comment