आजची वात्रटिका
--------------------
लिंकची त्रिसूत्री योजना
आधार म्हणाले मतदार कार्डला,
अखेर तुझी माझी लिंक जुळते आहे.
त्याचा परिणाम काय होणार?
ज्याचे त्याला चांगलेच कळते आहे.
बोगसगिरी नक्की टळू शकते,
हे मात्र खरोखरच खूप छान आहे.
त्यांच्या जुळलेल्या लिंकला,
साक्षीदार तर आपले पॅन आहे.
आधार की जिंदगी अजूनही उधार,
तरी हे सच्चाईचे नवे टॉनिक आहे !
आपल्या जुन्या कटू अनुभवामुळे,
पॅन कार्ड मात्र अजूनही पॅनिक आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8861
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
19मार्च2025
No comments:
Post a Comment