आजची वात्रटिका
--------------------
गुंडागर्दीची व्हिडिओग्राफी
आपली दहशत दाखवायची,
कार्यकर्त्यांना मोठी हौस आहे.
गुंडागर्दीच्या व्हिडिओंचा,
सोशल मीडियावर पाऊस आहे.
ॲक्शन पटालाही लाजवील,
अशी ही व्हिडिओग्राफी आहे.
व्हिडिओ सांगतो व्हिडिओला,
ज्याची त्यांना इशाराही काफी आहे.
यांनी त्यांचे;त्यांनी यांचे,
व्हिडिओवर व्हिडिओ टाकले आहेत !
राजकीय गुंडागर्दीच्या इतिहासाचे,
सोशल मीडियावर दाखले आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8856
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
13मार्च2025
No comments:
Post a Comment