आजची वात्रटिका
--------------------
मोबाईल फॅमिली
वाटते श्रम,पैसा आणि वेळ,
मोबाईल सगळेच वाचवतो आहे.
पण घरातल्या प्रत्येकाला,
मोबाईल बोटावर नाचवतो आहे.
संसारात एक एक पट असेल तर,
दुसरासुद्धा नक्की दुप्पट आहे,
मोबाईलमुळे घटस्फोटांचे प्रमाण,
आता पहिल्यापेक्षा तिप्पट आहे.
आज घरातला प्रत्येक जण,
लपाछपीचा खेळ खेळतो आहे !
एवढे तरी बरे निदान घटस्फोटासाठी,
नवरा बायकोला वेळ मिळतो आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-88612
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
20मार्च2025
No comments:
Post a Comment