आजची वात्रटिका
--------------------
जंगल राज
कुठल्याही जंगलचा कायदा,
असा काही फटका देऊन जातो.
प्रत्यक्ष शिकारीसुद्धा मग,
इथे आयती शिकार होऊन जातो.
आपण केलेली पापं सुद्धा,
जिथल्या तिथे फेडावे लागतात.
इतरांसाठी टाकलेल्या जाळ्यात,
स्वतःलाच हातपाय खुडावे लागतात.
इथे शिकार आणि शिकारी सुद्धा,
कधी एकच आणि कायम नसतो !
बळी तो कानपिळी,
हाच इथला जंगली नियम असतो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8852
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
9 मार्च2025
No comments:
Post a Comment