Tuesday, March 4, 2025

मूकसंमती....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------

मूकसंमती

नागव्यांना नागवेपणाची,
सांगा कुठे लज्जा आहे?
नागव्यांना नागवे म्हणती,
नागवेपणातच मज्जा आहे.

नागव्यांच्या नागवेपणाला,
कोपरापासून सलाम आहेत.
त्यांच्या निर्लज्जपणाचे कारण,
नागवे सवयीचे गुलाम आहेत.

नागव्यांचा त्यात दोष नाही,
त्यांची जी अवस्था आहे !
नागव्यांना असते मूकसंमती
निर्लज्ज इथली व्यवस्था आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8847
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
4 मार्च2025
 

No comments:

daily vatratika...6march2025