आजची वात्रटिका
--------------------
आठ मार्चचा संवाद
आरक्त होऊ; विरक्त होऊ ,
आपण एकमेकांचे भक्त होऊ.
आपण एकमेकांपासून नाही,
अनिष्ट परंपरांपासून मुक्त होऊ.
आपण परस्परांचे साथीदार,
आपल्यात कशाला रेस हवी आहे?
तुझी तुला;माझी मला,
दोघांनाही स्वतःची स्पेस हवी आहे.
आपण परस्पर पूरक ठरू,
अशीच प्राकृतिक रचना आहे !
स्पर्धा नको;संघर्ष नको,
ही याचना नाही सूचना आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8851
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
8 मार्च2025
No comments:
Post a Comment