आजची वात्रटिका
--------------------
बदनामी आणि उदात्तीकरण
कुणी करतोय बदनामी,
कुणी उदात्तीकरण करतो आहे.
ज्याला जसे पाहिजे तसे,
जो तो राजकारण करतो आहे.
बदनामी आणि उदात्तीकरण,
ही तर सारखीच कृती आहे.
सारे एकाच माळीचे मणी,
ही तर सारखीच विकृती आहे.
बदनामी आणि उदातीकरणाचे,
अनेक अनुभव पाठीस आहेत !
इतिहासातले नायक खलनायक,
राजकारणासाठी वेठीस आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8849
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
6 मार्च2025
No comments:
Post a Comment