
Monday, July 21, 2025
दैनिक वात्रटिका l 21जुलै 2025वर्ष- पाचवेअंक - 51 वा l पाने -57

आदरपूर्वक सांगतो...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
आदरपूर्वक सांगतो...
कालपर्यंत तरी बरे होते,
आता मात्र उलटेच व्हायला लागले.
कुणाचा एकेरी उल्लेख करताच,
ते हमरी तुमरीवर यायला लागले.
एकेरी संबोधनात आत्मीयता होती,
एकेरी संबोधनात आत्मीयता आहे.
तिथे आहो जाहो करायचे कशाला?
जिथे जिथे मनात आत्मीयता आहे.
मनात खरा आदर पाहिजे,
मन चंगा तो कटोरीमे गंगा आहे !
ज्याच्या ज्याच्या मनात पाप,
त्याच्याकडूनच आज दंगा आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------
फेरफटका-8983
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
21जुलै 2025
Sunday, July 20, 2025
दैनिक वात्रटिका l 20जुलै 2025वर्ष- पाचवेअंक - 50 वा l पाने -57

दैनिक वात्रटिका
खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक..
संपादक-सूर्यकांत डोळसे
suryakantdolase.blogspot.com
मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा
पारंपरिक दृष्टिकोन बदलणाऱ्या वात्रटिका
बेधडक... बिनधास्त... मार्मिक आणि सडेतोड..
आजचा अंक
दैनिक वात्रटिका l 20जुलै 2025
वर्ष- पाचवे
अंक - 50 वा l पाने -57
अंक डाऊनलोड लिंक -
https://drive.google.com/file/d/1wA8Pkhgaor1PvnENmH1kZA-__eSCJ8Nq/view?usp=drivesdk
काय आहे आजच्या अंकात?
1) ग्रोकायन 122
2) वात्रटिका: इतिहास आणि वर्तमान
3) सूर्यकांत डोळसे यांच्या सन 2012 ते 2025 या काळात आजच्या तारखेलाच प्रसिद्ध झालेल्या 25+ सदाबहार वात्रटिका
4) बाल वात्रटिका
5) वाचकांचे अभिप्राय..
6) वात्रटिका संग्रह परिचय
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
#दैनिकवात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
हात चलाखी....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
Saturday, July 19, 2025
दैनिक वात्रटिका l 19जुलै 2025वर्ष- पाचवेअंक - 49 वा l पाने -57

बदनामीचे वारे... साप्ताहिक सरकारनामा वात्रटिका

सहजीवन...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
सहजीवन
गुन्हेगारी की राजकारण?
सांगा कोण जास्त डर्टी आहे?
गुन्हेगारांनी व्यापलेली,
प्रत्येक पॉलिटिकल पार्टी आहे.
कुणाकडे थोडी कमी आहे,
कुणाकडे थोडी जादा आहे.
पक्षात या आणि पवित्र व्हा..
प्रत्येक पार्टीचा वादा आहे.
हात दाखवून अवलक्षण,
म्हणून फारसे कुणी बोलत नाही !
गुंडा पुंडांच्या आशीर्वादाशिवाय,
जणू पार्टीचे पान हालत नाही !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------------
फेरफटका-8981
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
19जुलै 2025
Friday, July 18, 2025
दैनिक वात्रटिका l 18जुलै 2025वर्ष- पाचवेअंक - 48 वा l पाने -57

दैनिक वात्रटिका l 17जुलै 2025वर्ष- पाचवेअंक - 47 वा l पाने -57

अमंगळ सूत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
अमंगळ सूत्र
लोकशाहीच्या सभागृहात,
गुंड आणि झुंडशाहीचे स्तवन.
विधिमंडळ स्वतःशीच म्हणाले,
माझेच विधान मलाच भवन.
तेव्हा बिहार स्वतःशी पुटपुटले,
हे कॉपी-पेस्ट असे चित्र आहे.
राजकारणी आणि गुन्हेगारांमध्ये,
अत्यंत अमंगळ असे सूत्र आहे.
महाराष्ट्र मनापासून तळतळला,
कुणीही कसेही रंग देऊ शकतो !
गुंडागर्दीवर कुणी बोलाल तर,
तुमच्यावर हक्कभंग येऊ शकतो !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------
फेरफटका-8980
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
18जुलै 2025
Thursday, July 17, 2025
दैनिक वात्रटिका l 16जुलै 2025वर्ष- पाचवे अंक - 46 वा l पाने -57
देव दर्शन....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
देव दर्शन
कुणाला स्वतः देव दिसू लागला,
कुणाला दुसऱ्यात देव दिसू लागले.
भक्तांची आंधळी भक्ती बघून,
सगळेच्या सगळे देव हसू लागले.
ज्याला ज्याला पाहिजे मोका,
त्याच्यासाठी आयताच मोका आहे.
देव देवांना म्हणू लागले,
आपल्या अस्तित्वालाच धोका आहे.
तेहतीस कोटी देवांची,
जणू कोटीवर मिश्किल कोटी आहे !
प्रत्यक्ष देवही समजू शकतात,
हे सगळे निष्ठा दर्शनापोटी आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------
फेरफटका-8979
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
17जुलै 2025
Wednesday, July 16, 2025
दैनिक वात्रटिका l 15जुलै 2025वर्ष- पाचवेअंक - 45 वा l पाने -57
डावे उजवे....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
डावे उजवे
जसे कुणी उजवे आहेत,
तसे कुणी डावे आहेत.
सगळ्यांचे वैचारिक मतभेद,
सगळ्यांनाच ठावे आहेत.
वैचारिक बुद्धिभेद करून,
सतत हरवता येत नाही.
आपल्या सोयीचे निकष लावून,
डावे उजवे ठरवता येत नाही.
जसा उजवा डावा असतो,
तसा डावाही उजवा असतो !
कितीही चमचमला तरी,
काजवा तो काजवा असतो !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8978
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
16जुलै 2025
Tuesday, July 15, 2025
दैनिक वात्रटिका l 14जुलै 2025वर्ष- पाचवेअंक - 44 वा l पाने -57
दैनिक वात्रटिका
खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक..
संपादक-सूर्यकांत डोळसे
suryakantdolase.blogspot.com
मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा
पारंपरिक दृष्टिकोन बदलणाऱ्या वात्रटिका
बेधडक... बिनधास्त... मार्मिक आणि सडेतोड..
आजचा अंक
दैनिक वात्रटिका l 14जुलै 2025
वर्ष- पाचवे
अंक - 44 वा l पाने -57
अंक डाऊनलोड लिंक -
https://drive.google.com/file/d/1fixDKsLBcWVTRMwJTb_j6OMOj4ETy59Y/view?usp=drivesdk
काय आहे आजच्या अंकात?
1) ग्रोकायन 116
2) वात्रटिका: इतिहास आणि वर्तमान
3) सूर्यकांत डोळसे यांच्या सन 2012 ते 2025 या काळात आजच्या तारखेलाच प्रसिद्ध झालेल्या 25+ सदाबहार वात्रटिका
4) बाल वात्रटिका
5) वाचकांचे अभिप्राय..
6) वात्रटिका संग्रह परिचय
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
#दैनिकवात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
Monday, July 14, 2025
दैनिक वात्रटिका l 13जुलै 2025वर्ष- पाचवेअंक - 43 वा l पाने -57अंक डाऊनलोड लिंक -
निषेध विकृती...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
निषेध विकृती
नको त्या नको तशा विचारांची,
अगदी सहज स्वीकृती असते.
चांगला विचार पटला नाही की,
विरोधात निषेधाची विकृती असते.
विचारांचाही विचार व्हावा,
त्यासाठी सुतावरून स्वर्ग नको.
विचाराला विचाराने विरोध व्हावा,
त्यासाठी झुंडशाहीचा मार्ग नको.
झुंडशाही आणि दादागिरीचे,
आज ज्याला त्याला व्यसन आहे !
निषेधासाठी विकृत मार्ग निवडणे,
ही आज कालची फॅशन आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------
फेरफटका-8977
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
14जुलै 2025
Sunday, July 13, 2025
दैनिक वात्रटिका l 12जुलै 2025वर्ष- पाचवेअंक - 42 वा l पाने -57
राष्ट्रपुरुषांची बदनामी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका-------------------
राष्ट्रपुरुषांची बदनामी
सगळ्याच अंधभक्तांकडून,
हे प्रकार खुले आम केले जातात.
राष्ट्रपुरुषांची वाटणी करून,
राष्ट्रपुरुष बदनाम केले जातात.
राष्ट्रपुरुष विरुद्ध राष्ट्रपुरुष,
अशीच जोड लावली जाते.
कोण छोटा आहे? कोण मोठा आहे?
याची चढाओढ लावली जाते.
अंध भक्तांच्या चढओढीमध्ये,
फक्त राष्ट्रपुरुषच हारले जातात !
राष्ट्रपुरुष अमर असले तरी,
ते पुन्हा पुन्हा मारले जातात !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------
फेरफटका-8976
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
13जुलै 2025
Saturday, July 12, 2025
आजचा अंक दैनिक वात्रटिका l 11जुलै 2025वर्ष- पाचवेअंक - 41 वा l पाने -57
संधीचे नवनिर्माण...... साप्ताहिक सरकारनामा वात्रटिका
तीन तिघाडे.....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-------------------
तीन तिघाडे.....
आधी म्हणाले,पन्नास खोके,
आता दाखवू लागले बॅगा.
संजयच्या दिव्य दृष्टीला,
काय काय दिसते ते बघा ?
कुणी वेठीस,कुणाला नोटीस,
कधी वाटते फिक्सिंग आहे.
जी मुद्द्यावरून गुद्द्यावर गेली,
ती तर चक्क बॉक्सिंग आहे.
तीन तिघाडे काम बिघाडे,
असेच राजकारण जारी आहे !
सगळ्या अडचणी वरचा उतारा,
वारीवर वारी दिल्ली वारी आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------
फेरफटका-8975
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
12जुलै 2025
महाराष्ट्र माझा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका -------------------------- महाराष्ट्र माझा भोंदू बाबांचा सुळसुळाट झाला, सगळ्या भोंदूंचाच गाजावाजा. आपल्या स्वतःचीच फसवणूक, आज...
-
आजची वात्रटिका ---------------------- गेट-टुगेदर भूतकाळातले मित्र -मैत्रिणी, खूप वर्षानंतर भेटू लागले. उजळून येतात आठवणी, छोटे झाल्यासारखे व...













