Tuesday, May 26, 2009

धार्मिकतेची ग्लोबल लिंक

**** आजची वात्रटिक *****
********************

धार्मिकतेची ग्लोबल लिंक

टुंड्रा प्रदेशात पडतो बर्फ
त्याची वाळवंटात शिंक असते.
धार्मिक भावना दुखण्याची
अशीच तर ग्लोबल लिंक असते.

असे फक्त धार्मिक बाबतीतच
लोक नको तेवढे जागे असतात !
शेजारच्याच्या सुख-दु:खाबाबत
लोक केवळ बघे असतात !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Monday, May 25, 2009

काँम्रेड.......

****** आजची वात्रटिका******
***********************

काँम्रेड.......


काँम्रेड,असे मूळीच नाही
तुला कशाचेच ज्ञान नाही
एवढे मात्र नक्की की,
तुला वास्तवाचे भान नाही.

परिवर्तनाचा साधा नियम
अजूनही तू पाळला नाहीस.
तुझी भूमिका रास्त असूनही
माणसात माणसाळा नाहीस.

तुमच्या अढळ निष्ठा पाहून
लोक म्हणतात,हे हेकट आहेत !
काँम्रेड, ढळू नकोस,चळू नकोस
तुझेही दिवस निकट आहेत !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

http://suryakantdolase.blogspot.com/

काँम्रेड.......

****** आजची वात्रटिका******
***********************

काँम्रेड.......


काँम्रेड,असे मूळीच नाही
तुला कशाचेच ज्ञान नाही
एवढे मात्र नक्की की,
तुला वास्तवाचे भान नाही.

परिवर्तनाचा साधा नियम
अजूनही तू पाळला नाहीस.
तुझी भूमिका रास्त असूनही
माणसात माणसाळा नाहीस.

तुमच्या अढळ निष्ठा पाहून
लोक म्हणतात,हे हेकट आहेत !
काँम्रेड, ढळू नकोस,चळू नकोस
तुझेही दिवस निकट आहेत !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

http://suryakantdolase.blogspot.com/

Sunday, May 24, 2009

उद्धव विरुद्ध राज

***** आजची वात्रटिका ****
*********************

उद्धव विरुद्ध राज

राजकीय भांडणातसुद्धा
मराठी बाणा जपायला लागले.
अगदी ठाकरी शैलीमध्येच
एकमेकांना झापायला लागले.

मराठी माणसाच्या नावाखाली
वेगवेगळे हेतु आहेत
त्यांचे प्रबोधन कुणी करावे ?
ते तर प्रबोधनकारांचे नातु आहेत.

सेनापतींच्या बाळकडूमुळेच
हा मार्मिक सामना रंगतो आहे !
चित्र-विचित्र व्यंग पाहून

दोन्हीकड्चा सैनिक खंगतो आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Saturday, May 23, 2009

बहुमताचा चमत्कार

बहुमताचा चमत्कार

बहुमताचे चमत्कार
तेंव्हाच कळू लागतात.
जेंव्हा बिनशर्त पाठिंबा घेऊन
पक्षच मागे पळू लागतात.

सरकार स्थिर असले की,
सगळेच काही स्थिर असते !
तिथेच बोटे घालता येतात
जिथे थोडीफार चिर असते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Friday, May 22, 2009

प्रचाराची जातकुळी

***** आजची वात्रटिका ****
*********************

प्रचाराची जातकुळी

कुठे तुतारी वाजवली होती
कुठे टाळी वाजवली होती.
जातीयवादी प्रचाराने
अंदाधुंदी माजवली होती.

जातीसाठी माती खात
जातीने जातीला जागले होते.
स्वत:ला पुरोगामी समजणारेही
जातीने प्रचाराला लागले होते.

आम्हीच कशाला सांगावे ?
सर्वांनाच सगळे द्न्यात आहे !
जय आणि पराजयातही
खरा जातीचाच हात आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

जातीसूत्र

जातीसूत्र

जात जन्माला येत नाही
जात जन्मानंतर रूजवली जाते.
जात जातीय खुणांनी
छान सजवली-धजवली जाते.

जात गेल्यासारखी वाटते.
पण जात काही जात नाही.
जात म्हणजे असाध्य रोग
उपाय काही द्न्यात नाही.

जात जाईल कशी ?
जात जातीने पाळली जाते.
जात जातीला भेटताच
जात जातीवर भाळली जाते.

जातीच्या मूळाशी
जाती-जातीचे गोत्र असते !
’ रूजवा आणि माजवा ’
हे जाती-जातीचे सूत्र असते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Thursday, May 21, 2009

मतदानाचा पर्दाफाश

मतदानाचा पर्दाफाश

बुथवरचे मतदान
उघडे पडू लागले.
कार्यकर्त्यांचे बुरखे
मतदानयंत्र फाडू लागले.

बुथवरचे गुप्त मतदान
उघड होणे बरे नाही !
बोल घेवड्या कार्यकर्त्यांचे
आता काही खरे नाही !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

मतदान यंत्रांचा गौप्यस्फोट

मतदान यंत्रांचा गौप्यस्फोट


केंद्रा-केंद्रावरच्या मतदानाचे
गौप्यस्फोट होऊ लागले.
लोकशाहीच्या मूळ तत्त्वांचाच
यंत्र घोट घेऊ लागले.


लोकशाहीचे मूळ तत्त्वच
खरे तर ’गुपित’ आहे !
हे यांत्रिक वरदान
गावा-गावांसाठी शापित आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Wednesday, May 20, 2009

खानदानी दुश्मनी

खानदानी दुश्मनी


वाटेकरी वाढताच
खाली घसरावे लागले.
रक्ताचे नातेही
मराठीसाठी विसरावे लागले.


मराठीच्या मुद्दयावरून
सेने-सेनेत आणीबाणी आहे !
ही दुश्मनी साधी नाही,
ती तर खानदानी आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

खानदानी दुश्मनी

खानदानी दुश्मनी


वाटेकरी वाढताच
खाली घसरावे लागले.
रक्ताचे नातेही
मराठीसाठी विसरावे लागले.


मराठीच्या मुद्दयावरून
सेने-सेनेत आणीबाणी आहे !
ही दुश्मनी साधी नाही,
ती तर खानदानी आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

ह्र्दयसम्राटांची ह्र्दयशून्यता

****** आजची वात्रटिका******
***********************

ह्र्दयसम्राटांची ह्र्दयशून्यता


पेशवाईचा इतिहास
पुन्हा पेश होऊ लागला.
आश्चर्याने चकित
मराठी देश होऊ लागला.


कु-हाडीचा दांडाच
इथे गोतास काळ झाला.
लोकसभेच्या भड्क्याने
आणखीनच जाळ झाला.


मातोश्रीवरून कॄष्णकुंजवर
मराठीचे बि-हाड आहे !
रक्ताच्या नात्यावर
काकांची कु-हाड आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Tuesday, May 19, 2009

रस्त्यावरचे विश्लेषण

रस्त्यावरचे विश्लेषण


राजकीय परिपक्वतेचे
दिवस सरायला लागले.
लोक पराभवाचे विश्लेषण
रस्त्यावर करायला लागले.


पराभव मान्य करणे
हा मुद्दा जरी सोयीचा नाही !
तरी रस्त्यावर विश्लेषण करणे
हा मार्ग लोकशाहीचा नाही !!


-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

पराभवाचे अपचन

पराभवाचे अपचन


जसा राजकारणाचा कडू घोट
सहज रिचवता आला पाहिजे
तसा राजकीय पराभवही
सहज पचवता आला पाहिजे.


कार्यकर्त्यांच्याही पचनी
पराभव पडायला पाहिजे !
ज्यांना हे जमत नाहीत्यांनी,
राजकारण सोडायला पाहिजे!!


-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Monday, May 18, 2009

भावी ते भावीच !

****** आजची वात्रटिका ******
************************

भावी ते भावीच !

भल्या भल्यांना धडा शिकवायला
लोक काही चुकले नाहीत.
भावी पंतप्रधानपद मात्र
लोक काढून घेऊ शकले नाहीत.

स्वप्न तर पहावीच लागतात
आशा कही सुटू शकत नाही !
भावी पंतप्रधानपद काही
पाच वर्षॆ तरी हटू शकत नाही !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Sunday, May 17, 2009

दोन्ही घरचा पाहुणा......

****** आजची वात्रटिका ******
************************

दोन्ही घरचा पाहुणा......

सिद्धिविनायक आणि विठोबा
दोघेही पावले होते.
विजय मागे येत रहिले
जिकडे ते धावले होते.

श्रद्धा होती,सबुरी होती
तरी लोकांना भावले नाहीत.
शिर्डीवाले साईबाबा
त्यांना काही पावले नाहीत.

सबका मालिक एक
तो सगळ्यांनी पाहिला आहे !
दोन्ही घरचा पाहुणा
उपाशीच राहिला आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Saturday, May 16, 2009

निकालाची दशा आणि दिशा

निकालाची दशा आणि दिशा

सर्वच पोलवाल्यांना
निकालांनी मागे टाकले आहे.
बिचारे कमळ तर
फुलता फुलता सुकले आहे.

आपलीच ’लाल’ म्हणायची
डाव्यांची संधी हूकली आहे.
नवनिर्माणाची उपद्रवक्षमता
सेनेला कळून चुकली आहे.

भंगलेल्या स्वप्नांनी
घड्याळाला काटे फुटले आहेत
हात मात्र हाताला
टाळ्या देत सुटले आहेत.

हत्ती लाकडॆ फोडीत बसला
मुंग्यांनी साखर खाल्ली आहे !
राजकीय स्थैर्याकडे
हळुहळू संसद चालली आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

निकालाची दशा आणि दिशा

निकालाची दशा आणि दिशा

सर्वच पोलवाल्यांना
निकालांनी मागे टाकले आहे.
बिचारे कमळ तर
फुलता फुलता सुकले आहे.

आपलीच ’लाल’ म्हणायची
डाव्यांची संधी हूकली आहे.
नवनिर्माणाची उपद्रवक्षमता
सेनेला कळून चुकली आहे.

भंगलेल्या स्वप्नांनी
घड्याळाला काटे फुटले आहेत
हात मात्र हाताला
टाळ्या देत सुटले आहेत.

हत्ती लाकडॆ फोडीत बसला
मुंग्यांनी साखर खाल्ली आहे !
राजकीय स्थैर्याकडे
हळुहळू संसद चालली आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

अर्धवट सत्य

अर्धवट सत्य

उमेदवारांच्या जिंकण्याचा
महाविनोदी किस्सा असतो.
अर्धेच होते मतदान
वाट्याला अर्धा हिस्सा असतो.

अर्ध्याचा अर्धा हिस्सा म्हणजे
तो हिस्सा तर पाव असतो !
नेतॄत्वाच्या लोकमान्यतेचा
हा लोकशाही आव असतो !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Friday, May 15, 2009

कार्यकर्त्यांनो......

****** आजची वात्रटिका******
***********************


कार्यकर्त्यांनो......

नेते राहतात बाजूला
तुम्हांलाच झुंजवले जाते.
उपेक्षॆच्या मातीमध्ये
तुम्हांलाच गंजवले जाते.

त्यांनी छू म्हटले की,
तुम्ही धावत सुटता.
शेपटीच्या तालावरती
तुम्ही चावत सुटता.

निष्टा आणि मूर्खपणात
मूलभुत फरक असतो !
राजकारण एवढे घाण की,
तो दुसरा नरक असतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

ऑर्कुट चे वास्तव

******* आजची वात्रटिका *******
**************************

ऑर्कुट चे वास्तव

चेहर्यावर अनेक चेहरे
लावतात लोक येथे.
गर्ल्स फ्रेण्ड्च्याच मागे
धावतात लोक येथे.

कौपी-पेस्ट्चाच मंत्र
इथे जपवला जातो.
कुठे न खपलेला माल
इथे खपवला जातो.

मैत्रीची नातीही इथे
तकलादू-बेगडी असतात.
आपल्या घराचे दरवाजे
कुठे सर्वांसाठी उघडी असतात ?

नकली नावे,नकली चेहरे
जो तो इथे मिरवतो आहे !
वास्तवाच्या आभासामध्ये
खरा चेहराही हरवतो आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

Thursday, May 14, 2009

आमचा अंदाज

ஓஓ छ्त्रपती संभाजी राजे यांच्या ३५३ व्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा !! ஓஓ


****** आजची वात्रटिका******
***********************

आमचा अंदाज

ज्योतिषावाले मोकाट,
एक्झिट पोलवर बंदी असते.
निवडणूक काळात कुडमुड्यांना
आयतीच सुवर्णसंधी असते.

जोतिषांवर बंदी घाला,
हा वेडेपणा आम्ही करणार नाही !!
त्यांचा एवढा चांगला कंड
दुसरीकडे कुठेच जिरणार नाही !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

स्वार्थ रक्षण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- स्वार्थ रक्षण सरळ चालण्याची अपेक्षा असणारा, आता वाकडी वाट धरू लागला. ज्याला बसविले डोक्यावरती, तोच कानाच...