दूध भेसळ करणारांना
शिक्षा तर अशी हवी.
नको दंड,नको जन्मठेप,
मरेपर्यंत फाशी हवी.
तेंव्हाच खरे दूधाचे दूध,
पाण्याचे पाणी होईल !
निष्पापांचे जीव घेणारा
भेसळखोर ज्ञानी होईल !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
Tuesday, March 29, 2011
Monday, March 28, 2011
नो बॉलचे गुपित
आपल्याला वाटते तो चुकतो,
पण तो मुद्दाम चुकत असतो.
तिला ’फ्री हिट’ मिळावा म्हणून
मुद्दामच नो बॉल टाकत असतो.
त्याच्या नो बॉलचे गुपित
असे आगळे-वेगळे असते !
तिला मिळालेल्या ’फ्री हिट’ मध्येच
त्याचे सगळे-सगळे असते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
पण तो मुद्दाम चुकत असतो.
तिला ’फ्री हिट’ मिळावा म्हणून
मुद्दामच नो बॉल टाकत असतो.
त्याच्या नो बॉलचे गुपित
असे आगळे-वेगळे असते !
तिला मिळालेल्या ’फ्री हिट’ मध्येच
त्याचे सगळे-सगळे असते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
Sunday, March 27, 2011
भाटशाही
जे मुळातच लेचेपेचे
ते तात्पुरते ताठ झाले.
शब्दांचे उधळीत फुलोरे
ते एकमेकांचे भाट झाले.
’भाटशाही जिंदाबाद’चा
नारा त्यांच्या ओठी आहे !
त्यांना सोडून इतरांना कळते
ही भाटशाही खोटी आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
ते तात्पुरते ताठ झाले.
शब्दांचे उधळीत फुलोरे
ते एकमेकांचे भाट झाले.
’भाटशाही जिंदाबाद’चा
नारा त्यांच्या ओठी आहे !
त्यांना सोडून इतरांना कळते
ही भाटशाही खोटी आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
Thursday, March 24, 2011
मस्तीवरचा विजय
सचिन,गौतम,युवराजची
बॅट अशी काही फिरली गेली.
मस्तवाल कांगारूंची
सगळी मस्ती जिरली गेली.
रैनाही रिमझिम रिमझिम नाही
दणदणीत कोसळला आहे !
आता पाकिस्तानचीही जिरवू शकतो
नवा आत्मविश्वास उसळला आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
बॅट अशी काही फिरली गेली.
मस्तवाल कांगारूंची
सगळी मस्ती जिरली गेली.
रैनाही रिमझिम रिमझिम नाही
दणदणीत कोसळला आहे !
आता पाकिस्तानचीही जिरवू शकतो
नवा आत्मविश्वास उसळला आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
सवयीचे गुलाम
ती नेटीझन आहे,
तोही नेटीझन आहे.
सगळे ’ऑनलाईन’ करण्याचा
दोघांचाही पण आहे.
नेटीझन असले तरी
एकमेकांची प्रचंड ओढ असते !
काहीही करायचे झाले तरी
त्यांचे आपले डाऊनलोड असते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
तोही नेटीझन आहे.
सगळे ’ऑनलाईन’ करण्याचा
दोघांचाही पण आहे.
नेटीझन असले तरी
एकमेकांची प्रचंड ओढ असते !
काहीही करायचे झाले तरी
त्यांचे आपले डाऊनलोड असते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
Wednesday, March 23, 2011
तीन तिघाडे काम बिघाडे
गर्जा महाराष्ट्र माझा...
म्हण्याची खरी इच्छा होते आहे.
आपल्या तीन माजी मुख्यमंत्र्यांचे
म्हणे स्विस बॅंकेत खाते आहे.
खरे काय ? खोटे काय ?
चौकशीअंती सिद्ध होईल !
अटकेपार झेंडे लावण्याची
आता खरोखरच हद्द होईल !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
म्हण्याची खरी इच्छा होते आहे.
आपल्या तीन माजी मुख्यमंत्र्यांचे
म्हणे स्विस बॅंकेत खाते आहे.
खरे काय ? खोटे काय ?
चौकशीअंती सिद्ध होईल !
अटकेपार झेंडे लावण्याची
आता खरोखरच हद्द होईल !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
Tuesday, March 22, 2011
पॅकेज चोर
चौकश्यावर चौकश्या
चौकश्यांचे किस निघाले.
चारशे पाच अधिकारी
चारशे वीस निघाले.
४०५ जणांचा ४२० पणा
हे तर हिमनगाचे टोक आहे !
हे सांगायची गरज नाही
आमचा कशाकडॆ रोख आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
चौकश्यांचे किस निघाले.
चारशे पाच अधिकारी
चारशे वीस निघाले.
४०५ जणांचा ४२० पणा
हे तर हिमनगाचे टोक आहे !
हे सांगायची गरज नाही
आमचा कशाकडॆ रोख आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
Sunday, March 20, 2011
चांदण्यातील जवळीक
तो थोडासा तिच्याजवळ सरकला,
सर्वत्र गहजब माजला होता.
लोकांच्या चर्चा ऐकुनच
तो मनामध्ये लाजला होता.
एवढ्या वर्षांचा प्रयत्नही
कुठे कामा आला होता ?
ती म्हणजे पृथ्वी,
तो म्हणजे चंद्र,
त्याचा पार मामा झाला होता !
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
सर्वत्र गहजब माजला होता.
लोकांच्या चर्चा ऐकुनच
तो मनामध्ये लाजला होता.
एवढ्या वर्षांचा प्रयत्नही
कुठे कामा आला होता ?
ती म्हणजे पृथ्वी,
तो म्हणजे चंद्र,
त्याचा पार मामा झाला होता !
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
Saturday, March 19, 2011
साधी गोष्ट
मतांची खरेदी-विक्री
या देशात अवघड काम नाही.
विकिलिक्सच्या गौप्यस्फोटात
त्यामुळेच जराही राम नाही.
जगासाठी धक्का असेल,
आपल्यासाठी ही मामुली बाब आहे !
खरेदी-विक्री करणारांच्या हाती
दुर्दैवाने लोकशाहीची आब आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
या देशात अवघड काम नाही.
विकिलिक्सच्या गौप्यस्फोटात
त्यामुळेच जराही राम नाही.
जगासाठी धक्का असेल,
आपल्यासाठी ही मामुली बाब आहे !
खरेदी-विक्री करणारांच्या हाती
दुर्दैवाने लोकशाहीची आब आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
शिमग्याचा इशारा
ज्यांच्या पिकायच्या त्यांच्याच
पिकलेल्या पोळ्या असतात.
बाकीच्यांचा बारामाही शिमगा,
बारामाही होळ्या असतात.
व्यवस्थेविरूद्ध लढले की,
उगीच पोटशूळ उठले जाते.
वेदनेच्या आक्रोशालाही
बोंबलणे म्हटले जाते.
ही धगधगती आग अशी की,
अंत:करण चेतले पाहिजे !
होळीचा वणवा होण्याआधीच
आक्रोशाला समजून घेतले पहिजे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
पिकलेल्या पोळ्या असतात.
बाकीच्यांचा बारामाही शिमगा,
बारामाही होळ्या असतात.
व्यवस्थेविरूद्ध लढले की,
उगीच पोटशूळ उठले जाते.
वेदनेच्या आक्रोशालाही
बोंबलणे म्हटले जाते.
ही धगधगती आग अशी की,
अंत:करण चेतले पाहिजे !
होळीचा वणवा होण्याआधीच
आक्रोशाला समजून घेतले पहिजे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
Friday, March 18, 2011
डोळ्यातील सुनामी
तो चिड चिड चिडला की,
तिला खूपच एकाकी वाटते.
तो भूकंपासारखा थरथरला की
तिच्या डोळ्यात सुनामी दाटते.
सुनामी तर सुनामीच
एकच हाहा:कार होवून जातो !
तिच्या डोळ्यातील सुनामीत
तो बघता बघता वाहून जातो !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
तिला खूपच एकाकी वाटते.
तो भूकंपासारखा थरथरला की
तिच्या डोळ्यात सुनामी दाटते.
सुनामी तर सुनामीच
एकच हाहा:कार होवून जातो !
तिच्या डोळ्यातील सुनामीत
तो बघता बघता वाहून जातो !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
Thursday, March 17, 2011
राजकीय भविष्य
हात दाखवून अवलक्षण झाले,
शरदाच्या चांदण्याचा वीट आला.
शिवशक्तीचा आधार घेण्याएवढा
भीमशक्तीवाला धीट झाला.
बोलण्यात आणि कृतीमध्ये
कुठेच एकवाक्यता नाही !
नेत्यांमागे कार्यकर्ते जातील
याची थोडीही शक्यता नाही !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
शरदाच्या चांदण्याचा वीट आला.
शिवशक्तीचा आधार घेण्याएवढा
भीमशक्तीवाला धीट झाला.
बोलण्यात आणि कृतीमध्ये
कुठेच एकवाक्यता नाही !
नेत्यांमागे कार्यकर्ते जातील
याची थोडीही शक्यता नाही !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
Wednesday, March 9, 2011
महिला-मुक्ती
महिला मुक्तीच्या धोरणाची
घरा-घरात भक्ती केली जाते.
जन्माला येण्याअगोदरच
कायमची मुक्ती दिली जाते.
महिला मुक्तीच्या धोरणाची
घराघरात विकृत तर्हा आहे !
मुक्तात्मे म्हणत असतील,
इथे जन्म न घेतलेलाच बरा आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
घरा-घरात भक्ती केली जाते.
जन्माला येण्याअगोदरच
कायमची मुक्ती दिली जाते.
महिला मुक्तीच्या धोरणाची
घराघरात विकृत तर्हा आहे !
मुक्तात्मे म्हणत असतील,
इथे जन्म न घेतलेलाच बरा आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
Friday, March 4, 2011
राजकीय नशा
राजकीय नशेएवढी
दुसरी कोणतीही नशा नसते.
राजकीय नशा चढली की,
मग उतरायची भाषा नसते.
आहे ते वास्तव आहे,
हा शाब्दिक पोतारा नाही !
राजकीय नशेवरती
अजून तरी उतारा नाही !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
दुसरी कोणतीही नशा नसते.
राजकीय नशा चढली की,
मग उतरायची भाषा नसते.
आहे ते वास्तव आहे,
हा शाब्दिक पोतारा नाही !
राजकीय नशेवरती
अजून तरी उतारा नाही !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
Wednesday, March 2, 2011
बजेटची कथा
कितीही काटेकोरपणे करा
आर्थिक नियोजन फसले जाते.
गृहमंत्र्यांच्या हौसेपोटी
अर्थमंत्र्यांचे बजेट बसले जाते.
घरोघरच्या बजेटची
अशी सारखीच कथा असते !
नवरा नावाच्या अर्थमंत्र्याची
ही पारंपारिक व्यथा असते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
आर्थिक नियोजन फसले जाते.
गृहमंत्र्यांच्या हौसेपोटी
अर्थमंत्र्यांचे बजेट बसले जाते.
घरोघरच्या बजेटची
अशी सारखीच कथा असते !
नवरा नावाच्या अर्थमंत्र्याची
ही पारंपारिक व्यथा असते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
Tuesday, March 1, 2011
पासष्टी ते साठी
वयोमर्यादेच्या एका अटीने
जे होवू नये ते सारे झाले.
साठ वर्षांचे सगळे तरूण
अगदी अचानक म्हातारे झाले.
पासष्टीवरून साठीवरती
ज्येष्ठ नागरिकाची सवलत आहे !
म्हातारा म्हणाला म्हातारीला,
अगं,तारूण्य हीच खरी दौलत आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
जे होवू नये ते सारे झाले.
साठ वर्षांचे सगळे तरूण
अगदी अचानक म्हातारे झाले.
पासष्टीवरून साठीवरती
ज्येष्ठ नागरिकाची सवलत आहे !
म्हातारा म्हणाला म्हातारीला,
अगं,तारूण्य हीच खरी दौलत आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
Subscribe to:
Posts (Atom)
दैनिक वात्रटिका l 28मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 298वा l पाने -54
दैनिक वात्रटिका l 28मार्च 2025 वर्ष- चौथे अंक - 298वा l पाने -54 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1QFQFkgKdfL7eY4viFxy...

-
आजची वात्रटिका ---------------------- गेट-टुगेदर भूतकाळातले मित्र -मैत्रिणी, खूप वर्षानंतर भेटू लागले. उजळून येतात आठवणी, छोटे झाल्यासारखे व...