Monday, May 16, 2011

जातीय ओळख

पूर्वी पक्ष्यांना जात होती,
आता जाती-जातीचे पक्ष आहेत.
जातीय हितसंबंधांसाठी
अगदी जातीने दक्ष आहेत.

जाती-जातीला वापरून घेणारे
सर्वत्र जातीय दलाल आहेत !
जातीय ओळखीसाठी तर
विविध रंगी गुलाल आहेत !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

1 comment:

साधक said...

छोटी पण झकास कविता.

सूत्रांचे धागेदोरे... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- सूत्रांचा धागा दोरा सूत्र बित्र काही नसते, सूत्र फक्त नावाला असतो.  पिकवलेल्या बातमीला, सूत्...