Thursday, May 31, 2012

बंदचा ताळेबंद


कुणाचा बंद बंदिस्त,
कुणाचा बंद खुला असतो
कुणाचा बंद कडकडीत
कुणाचा बंद ढिला असतो

चित्र-विचित्र, आगळ्या-वेगळ्या
बंद बंदच्या गोष्टी असतात
त्या बंदचा तळतळाट जास्त
जेव्हा लोक कष्टी असतात!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

No comments:

घरोघरी मातीच्या चुली...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- घरोघरी मातीच्या चुली कारण ती माझी आई आहे, कारण तो माझा बाप आहे. आशा फिल्मी डायलॉगचा, राजकारणालाच त...