Saturday, May 12, 2012

पाण्याची बोंबाबोंब


धरण उशाला असूनही
कोरड मात्र घशाला आहे.
पाण्यासारखा घातला पैसा
सांगा तो कशाला आहे?

लोकांच्या तोंडातले पाणी
कुणाच्या तरी घशात आहे!
पाण्यासाठी बोंबाबोंब
अख्ख्या महाराष्ट्र देशात आहे!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
    मो. : 9923847269

No comments:

धडाकेबाज पुनरागमन...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- धडाकेबाज पुनरागमन मी पुन्हा येईन म्हणणारे, आक्रमक होऊन आले आहेत. साधेसुधे नाहीत तर, स्पष्ट बहुमत घ...