सावरून बसली
राज्यसभा
जेव्हा ती 'रेखांकित' झाली होती.
टक लावून बसले
कॅमेरे
जया शंकीत झाली होती.
नको ती बहादुरी बघून
जयाचा
'अभिमान' जागा झाला!
सिलसिल्याची कॅसेट ऐकून ऐकून
डोक्याचा अक्षरश:
भुगा झाला!!
- सूर्यकांत डोळसे ,पाटोदा(बीड)
दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...
No comments:
Post a Comment