Friday, May 11, 2012

नैसर्गिक धडा


आपण पाणी अडवीत नाही,
आपण पाणी जिरवीत नाही.
जमिनीची पुरती तहान
आपण कधीच पुरवीत नाही.

आपली सगळी मस्ती
निसर्ग पुरती जिरवू लागला!
दुष्काळाचे कडक धडे
दरवर्षी गिरवू लागला!!

- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

No comments:

दुकानदारी.... प्रसिद्ध वात्रटिकावर व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------------- दुकानदारी ज्यांची ज्यांची दारुची दुकानं त्यांचीच शिक्षणाची दुकानं आहेत. त्यांच्यासाठी प...