Thursday, November 5, 2026

कटू सत्य... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका

-------------------------

कटू सत्य

तेच सत्य मानले जाते
जे आपल्याला रूचले जाते.
तेच सत्य पचविले जाते
जे आपल्याला पचले जाते.

सत्याच्या आवडी-निवडीचा
इथेच खरा गफला आहे !
जो सोयीचे सत्य सांगेल
तोच फक्त आपला आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269

-------------------------

फेरफटका
दैनिक झुंजार नेता
5 नोव्हेंबर 2012


आज गोकुळात... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका 
---------------

आज 
गोकुळात...

दुधाच्या राजकारणाची,
नवीनच व्हर्जन आहे.
गोकुळच्या आनंदामध्ये,
सरकारी विरजण आहे.

बहुमत आणि कोरम , 
हे एकमेकांचे जुळे आहे !
गाय म्हणाली म्हशीला, 
कळेना कोण दुधखुळे आहे ?

-सूर्यकांतडोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------
दैनिक वात्रटिका 
अंक 87 वा
वर्ष सहावे 
5 नोव्हेंबर 2026

स्टार वॉर... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
-------------------------

स्टार वॉर 

बॉलीवूडचे अभिनेते, 
अभी नेते होण्यात दंगले. 
पक्षा पक्षात मग, 
प्रचाराचे 'स्टार वॉर' रंगले.

बघता बघता ' पॉलीवूड ' चे,
चक्क बॉलीवूड झाले !
युक्ताच्या मुखी सुद्धा, 
"आले रे आले, फील गुड आले !!"

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा(बीड)
    मोबाईल-9923847269
------------------------------
चिमटा-
दैनिक पुण्यनगरी
17 मार्च 2004

देऊळ.... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
------------------------------

देऊळ 

सामाजिक प्रबोधनालाही, 
इथे विडंबन म्हटले जाते. 
सिनेमा, नाटक,गाण्यामुळे,
वादाचे वादळ उठले जाते.

वादळ असे उठत नाही, 
दांभिकांकडून ते उठवले जाते !
काठीलाही साप साप म्हणून, 
भोळ्या भक्तांना पटवले जाते !!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा(बीड)
    मोबाईल-9923847269
------------------------------
फेरफटका-4251
दै.झुंजार नेता
5 नोव्हेंबर 2011

भ्रमाचा भोपळा. ... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
-------------------------

भ्रमाचा भोपळा 

महागाईचे सारे विक्रम, 
बघता बघता उध्वस्त झाले. 
तरीही खोटे दिलासे, 
महागाईतले इंधन स्वस्त झाले. 

वितभर कमी केले जाते,
जे हातभर वाढले होते !
पंपावर गेल्यावर कळाले, 
आवळे देऊन कोहळे काढले होते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
चिमटा-2769
दैनिक पुण्यनगरी
5नोव्हेंबर 2011 

दैनिक वात्रटिका l 4 नोव्हेंबर2026वर्ष- सहावे





दैनिक वात्रटिका
खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक...
संपादक-सूर्यकांत डोळसे
suryakantdolase.blogspot.com

मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा
पारंपरिक दृष्टिकोन बदलणाऱ्या वात्रटिका
बेधडक... बिनधास्त... मार्मिक आणि सडेतोड..

आजचा अंक

दैनिक वात्रटिका l  4 नोव्हेंबर2026
वर्ष- सहावे
अंक - 86 वा l पाने -57
अंक डाऊनलोड लिंक  -
https://drive.google.com/file/d/1_DlET5Ms-Vu17Z5j6Vmoln4CwYx3PhTI/view?usp=drivesdk

काय आहे आजच्या अंकात?

1) ग्रोकायन -425
2) वात्रटिका: इतिहास आणि वर्तमान
3) सूर्यकांत डोळसे यांच्या सन 2011 ते 2026 या काळात आजच्या तारखेलाच प्रसिद्ध झालेल्या  25+ सदाबहार  वात्रटिका
4) बाल वात्रटिका
5) वाचकांचे अभिप्राय..
6) वात्रटिका संग्रह परिचय
7) मला आवडलेली वात्रटिका
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि  सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
#दैनिकवात्रटिका
#सूर्यकांतडोळसे

विशेष सूचना -ज्यांना अंक डाउनलोड होणार नाही किंवा करता येणार नाही त्यांनी त्यांच्या ग्रुपमध्ये मला ॲड करा किंवा मला 99 23 847 269 या व्हाट्सअप क्रमांकावर मला दैनिक वात्रटिकाचा अंक पाठवा असा whatsapp करावा
https://suryakantdolase.blogspot.com
इथूनही आपण पूर्वीचे सगळे अंक डाऊनलोड करू शकतात.

शपथ पूर्वक सांगतो की... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका



आजची वात्रटिका
--------------------

शपथपूर्वक सांगतो की, 

याची आहे ; त्याची आहे, 
शपथेवरती पुन्हा शपथ आहे.
सगळ्यांनाच वाटू लागले,
शपथ म्हणजे आफत आहे.

औपचारिकतेचा भाग म्हणून, 
शपथेवर शपथा घेतल्या जातात.
फोटो बिटो काढून झाले की,
शपथा मातीत घातल्या जातात.

असे फार कमी लोक असतील, 
ज्यांचा शपथविधी घडलेला नाही !
कितीतरी शपथा आल्या गेल्या,
कशातच फरक पडलेला नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9449
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता 
5 नोव्हेंबर 2026
----------------------------




Wednesday, November 4, 2026

गुड न्यूज... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
-------------------------

गुड न्यूज 

सरकारी आवेदन पत्रावर, 
आता आईचेही नाव. 
बापाच्या बरोबरीने, 
आता आईलाही भाव.

स्त्री पुरुष समानतेचे, 
थोडे थोडे लक्षण आहे !
33 टक्के आरक्षणाचे, 
संसदेत मात्र अवलक्षण आहे !!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा(बीड)
    मोबाईल-9923847269
------------------------------
टोपीवर टोपी
दैनिक लोकप्रश्न 
21 जानेवारी 2000

पक्षीय वास्तव... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
-------------------------

पक्षीय वास्तव 

इच्छाशक्ती असली की, 
राजकारण जोरात करता येते. 
पक्षा बिक्षाची गरजच काय?
ऐनवेळी कुठेही घुसता येते. 

शेवटी सत्तेची भूक महत्त्वाची, 
पक्ष तोंडी लावायला लागतो !
निष्ठा आणि तत्वाच्या गप्पा मारीत, 
लोकांना शेंडी लावायला लागतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
चिमटा-2768
दैनिक पुण्यनगरी
4 नोव्हेंबर 2011 


विकासाची तक्रार... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
------------------------------

विकासाची तक्रार 

विकास मनाला उद्योजकाला, 
तुझे कसे झकास आहे. 
तुझी वाढ होत राहिली, 
मी मात्र भकास आहे. 

तुझा माझा अनैतिक संबंध 
आजकाल सर्व ज्ञात आहे !
तुझी बाळंतपण होतात, 
माझा मात्र गर्भपात आहे !!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा(बीड)
    मोबाईल-9923847269
------------------------------
फेरफटका-4250
दै.झुंजार नेता
4 नोव्हेंबर 2011

सत्ताकारणाच्या डिमांड... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका 
---------------------------
सत्ताकारणाच्या 
 डिमांड 

बदलत्या सत्ताकारणाच्या, 
बघा कसल्या कसल्या डिमांड आहेत. 
एका पक्षाचे हाय कमांड, 
दुसऱ्या पक्षाचे हाय कमांड आहेत.

सहन होत नाही सांगता येत नाही, 
तरी सगळ्या गोष्टी आवडल्या जातात !
राजकीय अतिप्रसंग टाळण्यासाठी,
गुपचूप शेळ्या निवडल्या जातात !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------
दैनिक वात्रटिका 
4 नोव्हेंबर 2026

जय पराजयाचे विश्लेषण... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
--------------------

जय पराजयाचे विश्लेषण

कुणा एकाला जिंकवण्यासाठी, 
दुसऱ्या कुणाला पाडावे लागते. 
विजय पराभव कुठलाही असो,
सगळीकडे हेच घडावे लागते.

आपण जिंकलो कसे ?
जिंकणारा कधी शोध घेत नाही.
आपण नेमके हरलो कसे?
हारणाला नीट बोध होत नाही.

विजयाचा होतो उदो उदो,
पराभव नेहमीच गोत्यात असतो!
वजाबाकीचा सगळा ताळमेळ, 
पराभूतांच्याच खात्यात असतो!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9448
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता 
4 नोव्हेंबर 2026
----------------------------





Tuesday, November 3, 2026

बोके आणि धोके... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका



आजची वात्रटिका
------------------------------

बोके आणि धोके 

आपसात भांडती जे,
ते मस्तावलेले बोके आहेत. 
लोण्याचे गोळे आपले, 
हेच खरे धोके आहेत. 

हे बोके एवढे इरसाल की, 
आपल्यालाच उलटे जाब आहेत !!
बोक्यांच्या भांडणात, 
बोक्यांचेच लाभ आहेत !!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा(बीड)
    मोबाईल-9923847269
------------------------------
फेरफटका-4249
दै.झुंजार नेता
3 नोव्हेंबर 2011

दक्षता सप्ताहाची प्रतिज्ञा.. प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
-------------------------

दक्षता सप्ताहाची 
प्रतिज्ञा 

जातीभेद तर टाळायचाच, 
धर्मनिरपेक्षता असावी. 
लाच देताना,लाच घेताना,
एवढी तरी दक्षता असावी. 

लाच द्या;लाच घ्या,
ही तर पडत्या फळाची आज्ञा आहे !
मनातल्या मनात कर्मचाऱ्यांची, 
हीच तर प्रतिज्ञा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
चिमटा-2767
दैनिक पुण्यनगरी
3 नोव्हेंबर 2011 

दैनिक वात्रटिका l 3 नोव्हेंबर2026वर्ष- सहावे अंक - 85 वा l पाने -57


दैनिक वात्रटिका
खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक...
संपादक-सूर्यकांत डोळसे
suryakantdolase.blogspot.com

मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा
पारंपरिक दृष्टिकोन बदलणाऱ्या वात्रटिका 
बेधडक... बिनधास्त... मार्मिक आणि सडेतोड..

आजचा अंक 

दैनिक वात्रटिका l  3 नोव्हेंबर2026
वर्ष- सहावे 
अंक - 85 वा l पाने -57
अंक डाऊनलोड लिंक  -

काय आहे आजच्या अंकात? 

1) ग्रोकायन -424
2) वात्रटिका: इतिहास आणि वर्तमान 
3) सूर्यकांत डोळसे यांच्या सन 2011 ते 2026 या काळात आजच्या तारखेलाच प्रसिद्ध झालेल्या  25+ सदाबहार  वात्रटिका 
4) बाल वात्रटिका
5) वाचकांचे अभिप्राय..
6) वात्रटिका संग्रह परिचय
7) मला आवडलेली वात्रटिका
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि  सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
#दैनिकवात्रटिका
#सूर्यकांतडोळसे

विशेष सूचना -ज्यांना अंक डाउनलोड होणार नाही किंवा करता येणार नाही त्यांनी त्यांच्या ग्रुपमध्ये मला ॲड करा किंवा मला 99 23 847 269 या व्हाट्सअप क्रमांकावर मला दैनिक वात्रटिकाचा अंक पाठवा असा whatsapp करावा
https://suryakantdolase.blogspot.com
इथूनही आपण पूर्वीचे सगळे अंक डाऊनलोड करू शकतात.

संसाराचा खेळ.. प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------------

संसाराचा खेळ

त्याला आवडायचा फुटबॉल
तिला आवडायचा क्रिकेट.
कधी व्हायचा गोल,
कधी पडायची विकेट.

तेंव्हा त्यांच्या लक्षात आले
संसार म्हणजे खेळ नसतो!
आवडी निवडी वेगळ्या असूनही
तो दोन जीवांचा मेळ असतो !!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा(बीड)
    मोबाईल-9923847269
------------------------------
फेरफटका-886
दै.झुंजार नेता
7 जुलै 2002

विष प्रयोग... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका



आजची वात्रटिका
--------------------

विष प्रयोग

जाती-धर्माचे विष कालवले की, 
चांगल्या गोष्टीचा पचका होतो.
जुळत आलेल्या चांगल्या गोष्टीचा, 
अचानक मग विचका होतो.

चांगले काही होऊ द्यायचे नाही, 
असा त्यांचा इरादा पक्का आहे. 
जाती-धर्माचे कार्ड म्हणजे, 
त्यांच्यासाठी हुकूमाचा एक्का आहे.

जाती-धर्माचा विष प्रयोग,
जरी समाजासाठी मारक आहे !
तरी सगळे सामाजिक वातावरण, 
त्यांच्यासाठी अगदी पूरक  आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-9923847269
--------------------------
फेरफटका- 9447
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता 
3 नोव्हेंबर 2026
--------------------------




Monday, November 2, 2026

लाईट आणि फोन. प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
--------------------------------
लाईट आणि टेलिफोन

फोन म्हणाला लाईटला,
आपण दोघे बहिण भाऊ. 
दोघे मिळून जनतेचा, 
जमेल तसा जीव घेऊ. 

तुझे लोड शेडिंग कर, 
माझी लाईन बिझी असते !
सामान्य लोकांना फसविणे, 
खरंच खूप इझी असते !!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------
चिमटा-233 | दै.पुण्यनगरी
4 नोव्हेंबर 2004

दैनिक वात्रटिका l 2 नोव्हेंबर2026वर्ष- सहावे अंक - 84 वा l पाने -57


दैनिक वात्रटिका
खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक...
संपादक-सूर्यकांत डोळसे
suryakantdolase.blogspot.com

मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा
पारंपरिक दृष्टिकोन बदलणाऱ्या वात्रटिका 
बेधडक... बिनधास्त... मार्मिक आणि सडेतोड..

आजचा अंक 

दैनिक वात्रटिका l  2 नोव्हेंबर2026
वर्ष- सहावे 
अंक - 84 वा l पाने -57
अंक डाऊनलोड लिंक  -

काय आहे आजच्या अंकात? 

1) ग्रोकायन -423
2) वात्रटिका: इतिहास आणि वर्तमान 
3) सूर्यकांत डोळसे यांच्या सन 2011 ते 2026 या काळात आजच्या तारखेलाच प्रसिद्ध झालेल्या  25+ सदाबहार  वात्रटिका 
4) बाल वात्रटिका
5) वाचकांचे अभिप्राय..
6) वात्रटिका संग्रह परिचय
7) मला आवडलेली वात्रटिका
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि  सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
#दैनिकवात्रटिका
#सूर्यकांतडोळसे

विशेष सूचना -ज्यांना अंक डाउनलोड होणार नाही किंवा करता येणार नाही त्यांनी त्यांच्या ग्रुपमध्ये मला ॲड करा किंवा मला 99 23 847 269 या व्हाट्सअप क्रमांकावर मला दैनिक वात्रटिकाचा अंक पाठवा असा whatsapp करावा
https://suryakantdolase.blogspot.com
इथूनही आपण पूर्वीचे सगळे अंक डाऊनलोड करू शकतात.

बंडाची आयडिया... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
-------------------------

बंडाची आयडिया

हा ही बंडखोर आहे,
तोही बंडखोर आहे. 
सारेच जिथे निष्ठावंत,
कसा ओळखावा कोण चोर आहे? 

पक्ष काढतात;पक्ष फोडतात,
बंडखोरांच्या गटाला, 
मग नवीन नाव देतात !
चोरांचा समूह जमला की, 
सारेच चोर साव होतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-299
दैनिक झुंजार नेता 
14 ऑक्टोबर 2000

फेसबुकचे 'होम' पेज.. प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका



आजची वात्रटिका
----------------------

फेसबुकचे 'होम' पेज

नवरा आणि बायकोचे
फेसबुकवर खाते आहे.
विरहाचे गाणे
बिचारी बेडरूम गाते आहे.

चॅटींग, शेअरींग, पोस्टींगचे
रोज नवे रतीब लावत आहेत !
उगीच आपले हातचे सोडून
पळत्याच्या मागे धावत
आहेत !

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------
चिमटा-3223|दै.पुण्यनगरी
4 मार्च 2013

आपला झेंडा,आपला दांडा... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
--------------------

आपला झेंडा,
आपला दांडा 

निवडणुकांची चाहूल लागताच, 
भावी उमेदवार खुलायला लागले.
पाऊसवेड्या मोरांसारखे,
भावी उमेदवार डोलायला लागले.

कुणाची चाल सावधगिरीची
कुणाची जास्तच डांगडिंग आहे.
त्याची अवस्था तर विचारूच नका, 
ज्याच्या गुडघ्याला बाशिंग आहे.

ज्याचे मिळेल त्याचे तिकीट,
ज्याचा मिळेल त्याचा झेंडा असेल !!
कुठेच न जुळणाराच्या हाती,
आपला झेंडा आपला दांडा असेल!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9446
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता 
2 नोव्हेंबर 2026
----------------------------

कटू सत्य... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------------- कटू सत्य तेच सत्य मानले जाते जे आपल्याला रूचले जाते. तेच सत्य पचविले जाते जे आपल्य...