Showing posts with label आरोपांची भुतावळ... मराठी वात्रटिका. Show all posts
Showing posts with label आरोपांची भुतावळ... मराठी वात्रटिका. Show all posts

Friday, April 8, 2022

आरोपांची भुतावळ... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------
आरोपांची भुतावळ
निद्रिस्त असलेली भुते,
जागे होऊन नाचू लागले
एकमेकांच्या पापाचे पाढे,
सोयीनुसार वाचू लागले.
देर आये;दुरुस्त आये,
एवढाच खुलासा आहे!
ज्यांच्यावर आरोप नाहीत,
त्यांना सध्या दिलासा आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6461
दैनिक पुण्यनगरी
8एप्रिल2022


दैनिक वात्रटिका l 6 नोव्हेंबर2026वर्ष- सहावेअंक - 88 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blog...