आजची वात्रटिका
---------------------
आरोपांची भुतावळ
निद्रिस्त असलेली भुते,
जागे होऊन नाचू लागले
एकमेकांच्या पापाचे पाढे,
सोयीनुसार वाचू लागले.
देर आये;दुरुस्त आये,
एवढाच खुलासा आहे!
ज्यांच्यावर आरोप नाहीत,
त्यांना सध्या दिलासा आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6461
दैनिक पुण्यनगरी
8एप्रिल2022
1 comment:
Perfect
Post a Comment