आजची वात्रटिका
---------------------
सबुरीचा सल्ला
कधी पसरतात गैरसमज,
कधी तोंडाळपणाचा हाथ आहे.
आज-काल भावना दुखवायची,
कोरोनासारखीच साथ आहे.
फकत टाळ्याला लावण्यासाठी,
आपल्या जिभेचा वापर नको.
फकत जुने तेच सोने म्हणीत,
बौद्धिक अफरा-तफर नको.
हसवणूक नको,फसवणूक नको,
भावनिक कोमलता बरी नाही!
चिकित्सा आणि चर्चा टाळण्याची,
दांभिकता अजिबातच खरी नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6475
दैनिक पुण्यनगरी
22एप्रिल2022
No comments:
Post a Comment