आजची वात्रटिका
---------------------
पोरं खेळ
ईडीच्या कारवायांमुळे,
चर्चेला नवे खाद्य मिळू लागले.
आजकाल लहान मुलेसुद्धा,
चक्क 'ईडी ईडी'खेळू लागले.
चर्चेला नवे नवे खाद्य आहे,
चर्चेला नवे नवे वाद्य आहे.
प्रत्येकाच्या कृती कार्यक्रमाचे,
नक्की वेगवेगळे साध्य आहे.
तपास यंत्रणांच्या कारवाया,
नि:पक्ष दिसल्या पाहिजेत !
आता दिल्लीबरोबर गल्लीतही
ईडीच्या शाखाअसल्या पाहिजेत!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6460
दैनिक पुण्यनगरी
7एप्रिल2022
No comments:
Post a Comment