Friday, April 1, 2022

एप्रिल फुल.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

एप्रिल फुल

काही मूर्खपणा उघडा,
काही झाकीव आहे.
मुर्खांच्यांही हक्काचा,
एक दिवस राखीव आहे.

इतरांना मूर्ख बनवून,
मूर्ख बनवून घेतले जाते!
आपले सगळे वेंधळेपण,
एप्रिल फुल वर घातले जाते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7888
दैनिक झुंजार नेता
1 एप्रिल2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...