आ।ठ।व।णी।ती।ल
वा।त्र।टि।का
-------------------------------
आपले कर्तव्य
आचार,विचार, प्रचारात
जाणवावेत बाबासाहेब.
जिथे अजून भिनले नाहीत,
तिथे भिनवावेत बाबासाहेब.
रोज नव्या अर्थासाठी,
रोज उजवावेत बाबासाहेब.
जिथे जिथे अंधारपेरणी,
तिथे रुजवावेत बाबासाहेब.
काही कमवायचेच असेल तर,
त्यांनी कमवावेत बाबासाहेब.
हरवू लागले सूर जिथले,
तिथे घुमवावेत बाबासाहेब.
भटकले कुणी आपला रस्ता,
त्यांना सांधतील बाबासाहेब !
विद्रोहाची मशाल जिथे,
तिथे नांदतील बाबासाहेब !!
-सूर्यकांत डॊळसे, पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
चिमटा-5060
दैनिक पुण्यनगरी
14एप्रिल 2018
No comments:
Post a Comment